अरेरे, लहानपणी मैदानाचा, खेळाचा, व्यायामाचा वाराच तुम्हाला लागला नाही?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:38 PM2017-08-04T19:38:07+5:302017-08-04T19:40:20+5:30
शाळकरी वयातला व्यायाम, खेळ तुमची भविष्याची चिंता मिटवतो..
- मयूर पठाडे
तुम्ही रोज किती व्यायाम करता? सॉरी. तुम्ही रोज व्यायाम करता का? जाऊ द्या, आता नसाल करात.. तुमच्या लहानपणी तरी तुम्ही व्यायाम करीत होता का? तुम्हाला सांगायला आॅकवर्ड वाटत असेल तर हेही जाऊ द्या. मला सांगा, तुमची मुलं तरी व्यायाम करतात का?.
व्यायाम म्हणजे रोज उठून जोर बैठकाच काढायला पाहिजे किंवा जिममध्येच जायला पाहिजे असं नाही. कुठलाही मैदानी खेळ किंवा जॉगिंग, रनिंग.. ज्यामुळे शरीराची हालचाल होईल, घाम निघेल असं काही शारीरिक एक्झर्शन तुमची मुलं करतात का?
- करत असतील तर चांगलंच आहे. आणि करत नसतील तर ती आवड पालक म्हणून आपण त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपणही थोडा व्यायाम केला तरी काही हरकत नाही.
व्यायाम का करायचा?
- सगळ्यांनाच ते माहीत आहे.
व्यायाम का होत नाही?
त्यात बºयाचदा आरंभशुरपणाच जास्त का असतो?
- त्याचीही कारणं तुम्हाला माहीत आहेत.
पण लहानपणापासून व्यायामाची सवय आहे.
नुकत्याच झालेल्या संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे.
लहानपणी केलेला व्यायाम पुढे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातही आपल्याला फायदेशीर ठरतो. नंतर तुम्ही व्यायाम बंद केला तरी. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार नाही, पण अगोदर केलेल्या व्यायामाचा फायदा होतोच होतो.
लहानपणी तुम्ही व्यायाम केलेला असला तर तुमच्या शरीराला आणि मुख्य म्हणजे तुमच्या हाडांनाही ती सवय झालेली असते. ती बळकट होतात. एवढंच नाही, आपल्या हाडांच्या ‘मेमरी’तही ते फिट बसतं.
समजा, नंतरच्या आयुष्यात तुम्ही व्यायाम सोडला, तुमची जीवनशैली बिघडली, तरी त्यामुळे त्याचा म्हणावा तितका निगेटिव्ह परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही.
हाडे मोडण्याचं प्रमाण कमी होतं. तुमची चयापचय क्रिया तुलनेनं चांगली राहते.
त्यामुळे व्यायाम मस्ट.
कोणत्याही वयात.
लहान वयात तर अधिकच.
त्यामुळे तुमच्या मुलांनाही व्यायामाची सवय लावा.
तुम्हीही त्यांच्याबरोबर व्यायामाला, खेळायला, फिरायला जा..
आणि भविष्याची काळजी न करता बिनधास्त राहा.