देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:19 AM2020-08-26T03:19:18+5:302020-08-26T06:50:43+5:30

२१ ते ५० वयाचे ६१.३१% नागरिक कोरोनाबाधित; दिल्लीत २९.१% लोकांमध्ये अँटीबॉडी

Children between the ages of 5 and 17 in the country are at greater risk of corona; Revealed in the survey | देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे देशात निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे रोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आॅक्सफर्डच्या कोविड - १९ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूूट आॅफ इंडिया मंगळवारपासून सुरुवात करणार आहे. मात्र, याच सीरमच्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांपासून युवकांना कोरोनाचा अधिका धोका असल्याचे समोर आले आहे.

राजधानी दिल्लीत ५ ते १७ वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जास्त काळजी करावी लागत
आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. याच सर्वेक्षणानुसार दिल्लीतील २९.१ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसीत झाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणात १५ हजार नागरिकांचा सहभाग होता. त्यात जवळपास २५ टक्के १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. तर १८ ते ५० वर्षे वयाच्या लोकांची संख्या ५० टक्के होती. उर्वरीत २५ टक्के नागरिकांची संख्या ५० वर्षांपेक्षा अधिक होती.

दरम्यान, अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. लोकल सर्कल्सने केलेल्या सवेर्नुसार ६२ टक्क्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले.

आॅक्सफर्ड लसीच्या दुसºया चाचणीला सुरुवात
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला आॅक्सफर्डच्या लसीच्या दुसºया आणि तिसºया टप्प्यातील चाचण्या करण्यास ३ आॅगस्ट रोजी परवानगी दिली होती. या चाचण्या १७ निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत. ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी या लसीची दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे.

देशात, २१ ते ५० वर्षीय नागरिकांची कोरोनाबाधित संख्या सर्वाधिक आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या आकड्यांनुसार देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या २१ ते ५० वयाचे ६१.३१ टक्के नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, ही आकडेवारी २१ आॅगस्टपर्यंतची आहे.

Web Title: Children between the ages of 5 and 17 in the country are at greater risk of corona; Revealed in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.