चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय चांदीपुरा व्हायरस; जाणून घ्या, कारण, लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:59 AM2024-07-17T10:59:05+5:302024-07-17T11:05:36+5:30

Chandipura Virus : चांदीपुरा असं या व्हायरसचं नाव असून हा व्हायरस लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे. गुजरातच्या हिंमतनगर रुग्णालयात चांदीपुरा व्हायरसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. 

children die of suspected chandipura vesiculovirus infection spreads in gujarat symptoms preventions | चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय चांदीपुरा व्हायरस; जाणून घ्या, कारण, लक्षणं आणि उपाय

चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय चांदीपुरा व्हायरस; जाणून घ्या, कारण, लक्षणं आणि उपाय

कोरोना व्हायरसमुळे अजूनही लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये एका नवीन व्हायरसची एन्ट्री झाली आहे. चांदीपुरा असं या व्हायरसचं नाव असून हा व्हायरस लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे. गुजरातच्या हिंमतनगर रुग्णालयात चांदीपुरा व्हायरसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. 

चांदीपुरा व्हायरस हा पावसाळ्यात सक्रिय असतो. जो माशी किंवा डास चावल्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्ग ९ महिने ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. गुजरातच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, चांदीपुरा व्हायरसबद्दल घाबरण्याची गरज नाही, मात्र सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

चांदीपुरा व्हायरस असं नाव का ठेवलं?

१९६५ मध्ये नागपूर शहरातील चांदीपुरा येथे एका नवीन व्हायरस प्रादुर्भाव दिसून आला. १४ ते १५ वर्षे वयोगटातील अनेक मुलांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कारण हा व्हायरस देशात पहिल्यांदा नागपूरच्या चांदीपुरा गावातून आला होता, म्हणूनच या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणं

चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो.

चांदीपुरा व्हायरसबाबत असं सांगितलं जात आहे की, हा फ्लेबोटोमाइन माशी आणि एडिस डास चावल्यानंतर पसरतो. शास्त्रज्ञ याकडे आरएनए व्हायरस म्हणून पाहत आहेत. या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम १५ वर्षांखालील मुलांवर दिसून येतो. या आजाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये, मृत्यू दर ५६ टक्के ते ७५ टक्के असल्याचं दिसून आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे या व्हायरसशी लढण्यासाठी अद्याप कोणतंही औषध तयार झालेलं नाही.

चांदीपुरा व्हायरसपासून असा करा बचाव

चांदीपुरा व्हायरसची होऊ नये यासाठी, डास, माश्या आणि कीटकांपासून दूर राहणं सर्वात महत्वाचं आहे. यासाठी मुलांना रात्री आणि सकाळ संध्याकाळ फुल स्लीव्ह कपडे घालावेत. डास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री नेट वापरा. मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 

Web Title: children die of suspected chandipura vesiculovirus infection spreads in gujarat symptoms preventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.