मुलांच्या परीक्षा सुरू होणार; आहार, अभ्यासाचे 'असे' करा नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:31 PM2024-02-02T12:31:42+5:302024-02-02T12:38:33+5:30
परीक्षेच्या काळात आरोग्य, मन संतुलित ठेवण्याची गरज.
Health Tips : परीक्षेच्या काळात ताणतणावांचा सामना करण्याबरोबरच हवाबदलालाही विद्यार्थी सामोरे जात असतात. याकाळात सारखी तहान लागते. परीक्षेच्या टेन्शनमुळे भूकही लागत राहते. अशावेळी कम्फर्ट फूड म्हणजे पिझ्झा, नूडल्स, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे पदार्थ खाण्याची इच्छा बळावते. परंतु, परीक्षेच्या काळात आरोग्य जपण्याबरोबरच आळस झटकून अभ्यासाला लागायचे असेल आहाराचा भर घरच्या जेवणावर हवा, असे आहारतज्ज्ञ आणि होमिओपॅथी डॉ. वैशाली जोशी सांगतात.
कार्बोहायर्डेट, प्रोटिन, मिनरल्स, फॅट, विटॅमिन आणि पाणी यांचे संतुलन ठेवणारा आहार या काळात घ्यावा. मैद्यासारखे रिफाईंड अन्नपदार्थऐवजी पोळी, भाकरी यांना प्राधान्य द्यावे. प्रोटिनचा स्त्रोत असलेला डोसा, मोड आलेली कडधान्ये, अंडी, दूध, पनीर, दही, या काळात उत्तम आहे.
अभ्यासाबरोबरच हेही कराच?
सकस आहार, पुरेशी विश्रांती, सात ते आठ तास झोप आणि किमान एक तास व्यायाम हा नित्यक्रम असायला हवा. पुरेशी विश्रांती नसेल तर अशक्तपणा जाणवतो. व झोप अपुरी असेल तर उष्णता साठून राहिल्याने तोंड येण्यासारखे आजार होतात.
काय खावे ?
मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, लिंबू, संत्रे, आवळा, किवी, मोसंबी इत्यादीरताळे, गाजर, भोपळा, पपई, आंबा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
पालक, बदाम, शेंगदाणे, मासे इ.
कॅल्शियम - पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खसखस, राजगिरा, राजमा,मासे, कडधान्ये, नाचणी, कुळीथ इ.
पालेभाज्या, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, अंडे, कडधान्ये, धान्ये, फळभाज्या, मांसाहारी पदार्थ, मासे इत्यादी
जीवनसत्त्वे -
मॅग्नेशिअम - कडधान्ये, काजू, बदाम, आंबा, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ.
पोटॅशिअम - चिकू, फणस, जरदाळू, मोसंबी इ.
हे टाळा :
कोल्ड्रिंक, तळलेले पदार्थ, पिझ्झा, नूडल्स, चिप्स, चॉकलेट्स, कुकीज, बर्गरसारखे फास्टफूड टाळणे खूप गरजेचे असते. या पदार्थांमध्ये पोषणमूल्ये नसतात. त्यातून प्रतिकारकशक्ती वाढत नाही. खूप जास्त कार्बोहायर्डेट, फॅट असलेले पदार्थही जेवणात नसावे.
खाण्याच्या वेळा पाळा :
परीक्षेच्या दिवशी तीन-चार तास ऊर्जा मिळेल, असे सकस अन्न खावे. परीक्षा बरेचदा सकाळच्या वेळी असते. त्यामुळे सकाळची न्याहारी चांगली करायला हवी.
दुपारचे, रात्रीचे जेवण वेळेत घ्यावे. मधल्या वेळेत काही खावेसे वाटले तर सूप, सलाड, राजगिऱ्याचा लाडू, फळे, पोहे, उपमा, चणे-शेंगदाणे, व्हेज, भाज्या घालून केलेली फ्रॅंकी, पनीर सॅण्डवीच, इडली डोसा, डाळींचे आप्पे इत्यादी पर्याय आहेत