आपलं माणूस ओळखायची बाळांची युक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:46 AM2023-02-02T05:46:52+5:302023-02-02T05:47:28+5:30

Baby : तान्ह्या बाळाला काय आठवतं, तो कसं लक्षात ठेवतो, हा खरोखरच कुतूहलाचा प्रश्न आहे. बाळ अठरा एक तास झोपलेलं असतं. त्यावेळी खरंच त्याच्या मेंदूत काही हालचाली होत असतील का, की तेव्हा मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते?

Children's trick to know their man! | आपलं माणूस ओळखायची बाळांची युक्ती!

आपलं माणूस ओळखायची बाळांची युक्ती!

Next

- डॉ. श्रुती पानसे
(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com)
तान्ह्या बाळाला काय आठवतं, तो कसं लक्षात ठेवतो, हा खरोखरच कुतूहलाचा प्रश्न आहे. बाळ अठरा एक तास झोपलेलं असतं. त्यावेळी खरंच त्याच्या मेंदूत काही हालचाली होत असतील का, की तेव्हा मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते? बाळ अखंड झोपलेलं असतं, तरीही साधारण अडीच-तीन महिन्यांचं झाल्यावर जे त्याच्याजवळ आहेत, त्यांचा स्पर्श ते कसं ओळखतं? त्यांचे चेहरे हळूहळू का होईना, कसं ओळखायला लागतं? किंवा त्यांचे आवाजही ते कसं ओळखतं? 

- आईचा आवाज आला की, बाळ शांत होतं. कारण तिच्याशी त्याचा सहवास जास्त असतो. पोटात असल्यापासून आईचा आवाज त्याला सहज ऐकू येत असतो. बाकीच्यांचे आवाज तुलनेने अस्पष्ट ऐकू येतात, पण अगदी स्पष्ट ऐकू येत असतो, तो आईचा आवाज. या आवाजाशी त्याची अगदी जुनी ओळख असते. पुराना याराना या आवाजाशीच असतो फक्त. तसंच बाळाच्या  पाळण्यावर लावलेल्या चिमणाळ्याशीही त्याची  फारच दोस्ती होते. खोलीतला गरगर फिरणारा पंखा हाही त्याचा असाच पक्का दोस्त होतो. 

अशा पद्धतीने आसपासच्या जगाशी बाळाचा परिचय होत असतो. त्यातल्या काही गोष्टींशी फार लवकर मैत्री होते. हा मैत्रीचा संबंध दृढ कसा होतो? एकेक आठवण रुजू कशी होत जाते? या विषयावर न्यूरो सायंटिस्ट्सनी मूलभूत संशोधन केलं आहे. त्यावरून असं दिसतं की, प्रत्येक जीव जन्माला येतो, त्याच्या आधीपासूनच त्याच्या मेंदूची वाढ होत असते, त्याचबरोबर विकासही होत असतो. मेंदूतली ही प्रक्रिया काहीशी सुप्तावस्थेत असते.

आईच्या पोटात असतानाच त्याच्या मेंदूत न्यूरॉन्स नावाच्या पेशी तयार झालेल्या असतात. या पेशी फक्त मेंदूत असतात. इतरत्र शरीरात कुठेही नसतात. या पेशींना ‘शिकणाऱ्या पेशी’ असंही म्हणतात, इतकं त्यांचं महत्त्व आहे. त्या सुट्या स्वरूपात असतात. एकमेकींपासून अलग असतात.  बाळ जन्माला आलं की, त्या कार्यान्वित होतात. बाळाला जसे नवनवे अनुभव येतात, तसे हे न्यूरॉन्स एकमेकांशी जुळायला लागतात. मुख्य म्हणजे, या न्यूरॉन्सच्या जोडण्या म्हणजेच, त्याच्या आठवणीच्या जोडण्या असतात.  आयुष्यभर पुरेल इतकं काम या पेशींनी सुरुवातीच्या काही दिवसांतच करून ठेवलेलं असतं.

Web Title: Children's trick to know their man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य