मिरची खा आणि फुफ्फुसांचा कर्करोग टाळा; संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 11:13 AM2019-05-26T11:13:01+5:302019-05-26T11:34:57+5:30
एवढिशी दिसणारी, पण जेवणाची चव वाढवणारी मिरची आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. एवढचं नाही तर ही मिरची वजन कमी करणं, हृदयाच्या समस्या दूर करणं आणि सायनसवर उपचार म्हणून मदत करते.
एवढिशी दिसणारी, पण जेवणाची चव वाढवणारी मिरची आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. एवढचं नाही तर ही मिरची वजन कमी करणं, हृदयाच्या समस्या दूर करणं आणि सायनसवर उपचार म्हणून मदत करते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? ही मिरची फुफ्फुसांचा कॅन्सर रोखण्यासाठीही फायदेशीर ठरते. असं आम्ही सांगत नाही तर, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे.
एक्सपेरिमेंटल बायॉलजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून असं सिद्ध करण्यात आलं आहे की, मिरचीमध्ये कॅपलाइसिन (Capsaicin) नावाचं एक कंपाउंड अस्तित्वात असतं. जे लंग कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतं. पुरूष आणि महिलांमध्ये लंग कॅन्सरची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. हा आकडा पुरूषांमध्ये अधिक असतो. त्यामुळे या संशोधनाकडे लंग कॅन्सरवर उपाय म्हणून पाहता येऊ शकतं.
संशोधकांनी हे संशोधन करण्यासाठी मनुष्याचे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर सेल्सना कल्चर केलं. त्यातून त्यांना असं आढळून आलं की, कॅपसाइसिन नावाच्या कंपाउंडने कॅन्सर पसरवण्याची प्रक्रिया म्हणजेच, मेटास्टेसिसला पहिल्याच स्टेजवर रोखण्यात आलं. याव्यतिरिक्त संशोधकांनी उंदरांवरही एक्सपरिमेंट केलं. त्यांनी उंदरांना कॅपसाइसिन रिच डाएट खाण्यासाठी दिलं आणि आढळून आलं की, त्यामध्ये मेटास्टेटिक कॅन्सर सेल्सची संख्या त्या उंदरांच्या तुलनेत फार कमी होती. ज्यांच्यावर परिक्षण करण्यात आलं नव्हतं.
संशोधनातून हेदेखील सिद्ध झालं आहे की, कॅपसाइसिन कंपाउंड Src प्रोटीनलाही अॅक्टिव्ह होण्यापासून रोखण्यास मदत करतो. हे प्रोटीन कॅन्सर सेल्स पसरवणं आणि ग्रोथमध्ये मदत करतात. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या मिरचीचा डाएटमध्ये नक्की समावेश करा. खासकरून पुरूषांना हिरव्या मिरचीचा आहारामध्येसमावेश करणं आवश्यक आहे. कारण हे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंटही मुबलक प्रमाणात असतात आणि हे ब्लड सर्कुलेशनमध्येही मदत करतात.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.