Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 03:41 PM2020-02-15T15:41:33+5:302020-02-15T15:41:50+5:30
Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान अजून थांबायचं नाव घेत नाहीये. या व्हायरसचे शिकार होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दीड हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
चीनमध्येकोरोना व्हायरसचं थैमान अजून थांबायचं नाव घेत नाहीये. या व्हायरसचे शिकार होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दीड हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सतत कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पण जगभरात या आजारामुळे चिंतेचं वातावरण आहे. कारण यावर अजूनही ठोस उपाय सापडलेला नाही. अशात चीनकडून यावर उपाय सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे उपाय?
चीनच्या चायना डेली वृत्तपत्राने कोरोना व्हायरसवर उपचार शोधल्याचा दावा करणारा एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा कोरोना व्हायरसचा सर्वात प्रभावी उपचार आहे. असाही दावा केला जात आहे की, या उपचारा द्वारे नोवल कोरोना व्हायरसने संक्रमित गंभीर रूग्णांवर उपचार केले गेले आहेत आणि अनेक रूग्ण यातून बरेही झाले आहेत.
काय आहे ब्लड प्लाज्मा?
(Image Credit : nationalinterest.org)
चीनची सरकारी मेडिकल कंपनी नॅशनल बायोटेक ग्रुपने दावा केला आहे की, ब्लड प्लाज्माच्या माध्यमातून कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांना ठिक केलं जाऊ शकतं. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, ८ फेब्रुवारीनंतर कोरोना व्हायरसने संक्रमित साधारण १० रूग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि सर्व रूग्ण ठिक झालेत. या रिझल्टनंतर आता कंपनीला विश्वास वाटत आहे की, यावर व्हायरसवर उपचारासाठी उपचार मिळाला आहे.
कसा करतात ब्लड प्लाज्माने उपचार?
यात उपचार करण्यासाठी त्या व्यक्तीचं ब्लड प्लाज्मा केलं जातं जी व्यक्ती आधीच कोरोना व्हायरसने संक्रमित आहे आणि ठिक झाली आहे. नॅशनल बायोटिक ग्रुप कंपनीने सांगितले की, संक्रमणानंतर ठिक झालेल्या व्यक्तीच्या रक्तात हाय अॅंटीबॉडी आढळले आहेत. अशा लोकांच्या ब्लड प्लाज्माने आजारी रूग्णांवर उपचार शक्य आहे.
(Image Credit : straitstimes.com)
कंपनीने दावा केला आहे की, या उपचारानंतर २४ तासात प्रभाव दिसू लागतो. ज्या लोकांवर त्यांनी हा उपचार केला त्यांचा ताप आणि आजाराची इतर लक्षणे २४ तासात कमी झाले. आता हा प्रयोग वापरला जात आहे. कमीत कमी ७७ रजिस्टर्ड रूग्णांवर उपचार सुरू आहे.
जमा केले जात आहे ब्लड प्लाज्मा
चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनी आता अशा लोकांचा ब्लड प्लाज्मा एकत्र करत आहे जे आधी कोरोना व्हायरसने संक्रमित होते आणि आता ठिक झाले आहेत. अशा लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात समोर येण्यासाठी सांगितले जात आहे. त्यांना रक्तदान करण्यासाठी सांगितलं जात आहे.