CoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार? नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 15:42 IST2020-09-15T15:36:53+5:302020-09-15T15:42:06+5:30
सीडीसी प्रमुख जैव सुरक्षा तज्ज्ञ गुइजेन वू यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःलस टोचून घेतली होती. यानंतर कुठल्याही प्रकारची असमान्य लक्षणे दिसली नाही.

CoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार? नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार
नवी दिल्ली - सध्या संपूर्ण जग कोरोना लशीकडे डोळा लावून बसले आहे. यातच चीनमधून दिलासादायक बातमी आली आहे. चीनमध्ये विकसित होत असलेली कोरोना लस नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. चिनी रोग नियंत्रणच्या (CDC) एका अधिकाऱ्याने म्हटले आहे, की चीनजवळ परीक्षण पास करून अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या एकूण लशींपैकी तीन लशी जुलै महिन्यातच महत्वाच्या कामगारांना देण्यात आल्या आहेत.
लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण योग्य प्रकारे सुरू आहे. यावरून, नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यातच लस सर्वसामान्य जनतेसाठी तयार केली जाईल. सीडीसी प्रमुख जैव सुरक्षा तज्ज्ञ गुइजेन वू यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःलस टोचून घेतली होती. यानंतर कुठल्याही प्रकारची असमान्य लक्षणे दिसली नाही. मात्र, त्यांनी नेमकी कोणती लस टोचली होती हे सांगितले नाही.
चीनमधील चीन नॅशनल फार्मास्युटिक ग्रुप (Sinopharm) आणि अमेरिकन कंपनी सिनेव्हॅक बायोटेक (Sinivac Biotech) इमर्जन्सी उपयोग कार्यक्रमांतर्गत एकत्रितपणे तीन लशी तयार करत आहेत. तर चौथी लस कॅनसिनो बायोलॉजिक्स (Cansino Biologics) 6185.HK ने विकसित केली आहे. हीच लस चिनी सैनिकांनाही देण्यात आली आहे.
सिमोफार्माने जुलै महिन्यात यांसंदर्भात माहिती देताना म्हटले होते, की, या लशीच्या यशस्वी परीक्षणानंतर, ती सर्वजनिक वापरासाठी या वर्षीच्या अखेरपर्यंत तयार केली जाईल. जग भरातील वैज्ञानिक कोरोना लस तयार करण्यासाठी कंबरकसून काम करत आहेत. कारण जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश
मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री
"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"
सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा