मेंदूच्या अभ्यासासाठी संशोधकांनी माकडात विकसित केला मानवी मेंदू!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:17 AM2019-05-22T10:17:32+5:302019-05-22T10:21:10+5:30
मानवी मेंदूचा विकास कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी चीनच्या संशोधकांनी एक नवा प्रयोग केला आहे.
(Image Credit : Vox)
मनुष्याच्या मेंदूबाबत अजूनही संशोधकांना वेगवेगळ्या गोष्टींबाबत कोडं पडलेलं आहे. त्यामुळे जगभरात सतत मानवी मेंदूच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी संशोधक वर्षानुवर्षे रिसर्च करत असतात. असाच मानवी मेंदूचा विकास कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी चीनच्या संशोधकांनी एक नवा प्रयोग केला आहे. संशोधकांनी यासाठी माकडात मानवी मेंदू विकसित करण्यासाठी जीन टाकला आहे. या रिसर्चनुसार, एमसीपीएच १ जीन माकडाच्या भ्रूणात एका व्हायरसच्या मदतीने सोडण्यात आला. हा जीन मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावतो.
(Image Credit : Vox)
संशोधकांनुसार, या प्रक्रियेमध्ये ११ जेनेटिकली मोडिफाइड माकडांचा वापर केला गेला होता. ज्यातील ६ माकडांचा प्रयोगादरम्यान मृत्यू झाला. जिवंत राहिलेल्या ५ माकडांच्या मेमरी आणि रंग ओळखण्याच्या क्षमतेच्या आधारावर मेंदू समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
(Image Credit : Vox)
या माकडांच्या मेंदूला सुद्धा विकसित होण्यासाठी मनुष्यांइतकाच वेळ घेतला. माकडात विकसित झालेल्या मेंदूचा आकार मनुष्यांच्या मेंदूसारखाच आहे. कुनमिंग इन्स्टिट्यूट ऑफ जुलॉजीचे संशोधक बिंग शू यांनी सांगितले की, असं पहिल्यांदाच झालं की, जेनेटिकली मोडिफाइड माकडांच्या मदतीने मानवी मेंदूच्या विकासाला समजून घेतलं जात आहे.
या प्रयोगात सुरूवातीला यश मिळाल्यावर चीनचे संशोधक आनंदी आहेत. तर दुसरीकडे काही संशोधक याला बेजबाबदार आणि चुकीचं मानत आहेत. कोलोराडो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जेम्स सिकेला म्हणाले की, हा प्रयोग फार भयंकर आहे.