मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:52 PM2019-02-14T12:52:00+5:302019-02-14T12:54:42+5:30
मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, असं वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे यापासून कसा बचाव करता येईल याबाबत काही कंपन्या काम करत आहेत. त्यातीतल एका सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडने 'एनवायरोचिप' सादर केली आहे. या चिपने मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेट या उपकराणांमधून निघणाऱ्या हानिकारक इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनपासून सुरक्षा मिळणार आहे.
इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनसोबत सतत संपर्क येणे फार हानिकारक आहे. याचे दुष्परिणाम एकाएकी नाही तर कालांतराने हळूहळू दिसायला लागतात. कारण या रेडिएशनमुळे घर आणि ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या आरोग्यावर वाइट प्रभाव पडतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने २०११ मध्ये मोबाइल रेडिएशनला कॅन्सरचं संभावित कारण मानलं आहे. मात्र आता तयार करण्यात आलेल्या एनवायरोचिपने या हानिकारक रेडिएशनचा प्रभाव बदलून लोकांचं आरोग्य सुरक्षित राहतं असं सांगितलं जात आहे.
सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडचे निर्देशक प्रणव पोद्दार म्हणाले की, याने यंत्रांच्या वापराला विरोध नाहीये. तर यंत्रांमधून निघणाऱ्या हानिकारक लहरींना शुद्ध करतं. या चिपने यंत्रांची सिग्नल क्षमता किंवा त्यांची गुणवत्ता कमी केली जात नाही. तर एनवायरोचिप इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्समधून उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही संभावित आरोग्यासंबंधी धोक्याला दूर केलं जातं.
ते म्हणाले की, 'सध्या देशात आमचे १० लाख ग्राहक आहेत आणि ही संख्या वाढवण्याचा आमचा मानस आहे. भारत आणि परदेशातील मेडिकल-संशोधक संस्थांनी एनवायरोचिपवर खोलवर परिक्षण केलं आहे. ५०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या परिक्षणावरून समोर आलं आहे की, 'एनवोयरोचिप' च्या वापराने त्यांचा तणाव कमी झाला.