चॉकलेट, कॉफी आणि अॅसिडिटीमध्ये आहे खोलवर संबंध, जाणून घ्या कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:58 AM2019-01-18T10:58:35+5:302019-01-18T10:59:54+5:30
मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो.
मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. हेच कॉफीबाबत सांगता येईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत कॉफी पिण्याचं कोणतं ना कोणतं कारण असतंच. पण तुम्हाला माहीत आहे का की, चॉकलेट, कॉफी आणि अॅसिडीटचा खोलवर संबंध आहे. तुम्हालाही या दोन गोष्टींची सवय लागली असेल तर अॅसिडिटीपासून तुमची सुटका होऊ शकत नाही.
चॉकलेट
चॉकलेटची टेस्ट पसंत नसणारा क्वचितच कुणी सापडेल. पण हे आपल्या पोटासाठी फारच नुकसानदायक ठरु शकतं. ज्या लोकांनी नेहमी अॅसिडची समस्या असते त्यांच्यासाठी चॉकलेट घातकच मानलं जातं. यात कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारखे पदार्थ असतात, जे अॅसिडचं कारण ठरतात. तसेच यात भरपूर फॅट असतात, ज्यामुळे अॅसिड तयार होतं. त्यासोबतच यातील कोकोमुळेही समस्या होते. याने रिफ्लक्स वाढतं. चॉकलेट खाणं बंद करणं गरजेचं नाहीये, पण जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर कमी प्रमाणात चॉकलेट खावं.
कॉफी
काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिण्याची सवय असते. तेच काही लोक ऑफिस पोहोचून कॉफीचं सेवन करतात. मित्रांसोबत गप्पा करताना, अभ्यास करताना आणि रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पितात. जर तुम्ही किती कॉफी सेवन करता याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही आरोग्यावर किती अन्याय करत आहात. दिवसभरात एक कप कॉफी किंवा चहा पिणे पुरेसं आहे. पण याचं अधिक सेवन केल्यास अॅसिडिटीची समस्या डोकं वर काढते. कारण यात कॅफीनचं प्रमाण अधिक असतं. कॅफीन सेवनामुळे पोटात गॅस्ट्रिक अॅसिडचा स्त्राव होतो. ज्यामुळे अॅसिडिटी होते. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी सेवन करुन नये.
अॅसिडिटी
आपण खाल्लेलं अन्न योग्यप्रकारे पचन न झाल्यास पोटात गॅस आणि जळजळ होऊ लागते. यहा शरीराचा डिहायड्रेट होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे योग्य ठरेल की, चहा, कॉफी आणि चॉकलेटचं सेवन कमी प्रमाणात करावं. सोबतच याकडेही लक्ष द्या की, तुम्ही किती प्रमाणात चहा सेवन करत आहात. जास्तीत जास्त पाणी प्यावं. म्हणजे एक कप एक्स्ट्रा कॉफी प्यायल्यास दोन कप एक्स्ट्रा पाणी प्यावे.