अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्यास घाबरून न जाता; 'हे' सोपं काम करून मिळवा आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:17 PM2020-05-13T12:17:18+5:302020-05-13T12:20:07+5:30
अचानक दम लागत असेल किंवा श्वास घ्याला त्रास होत असेल तर काय करायला हवं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(image credit-the healthy)
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल घरातील व्यक्तींना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. अचानक दम लागण्याची समस्या जाणवते. काहीवेळा जेवताना श्वासनलिकेत घास अडकल्यामुळे दम लागण्याची समस्या उद्भवते. त्यानंतर पाणी प्यायल्यानंतर किंवा पाठ चोळल्यानंतर बरं वाटू लागतं. अचानक दम लागत असेल किंवा श्वास घ्याला त्रास होत असेल तर काय करायला हवं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दम लागणं ही सामान्य स्थिती आहे. जी साधारणपणे जेवताना किंवा घाबरल्यामुळे उद्भवू शकते. जेव्हा फुफ्फुसांपर्यंत योग्य प्रमाणात हवा पोहोचत नाही त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होतो. कारण त्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे दम लागायला सुरूवात होते. पण अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणं हे जीवघेणं सुद्धा ठरू शकतं.
लक्षणं
जोर जोरात खोकला येणं
श्वास घ्यायला त्रास होणं
बोलायला त्रास होणं
श्वास घेण्याचा प्रयत्न करत असताना नाकातून आवाज येणं
त्वचा, ओठ निळे पडणं
बेशुद्ध पडणं
श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे एखादी व्यक्ती अस्वस्थ झाली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. एखाद्या व्यक्तीला दम लागत असल्यास उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या मागे उभं राहून हातांनी कमरेला पकडा आणि पुढच्या बाजूला वाकवण्याचा प्रयत्न करा. एका हाताची मुठ तयार करून नाभीच्यावरच्या भागात ठेवा. हातांनी पोटावर दाब द्या. त्या व्यक्तीला वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया केल्यास दम लागण्याची समस्या दूर होईल. ही क्रिया ५ वेळा करा. (आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)
किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, गुडघ्यावर जमीनीवर बसा. संपूर्ण शरीर वाकवण्याचा प्रयत्न करा. हातांची मुठ तयार करून जमिनीला टेकवा. पुशअप्सचा व्यायाम करताना जशी शरीराची पोजिशन असते. त्याप्रमाणे ठेवा. त्यानंतर आपल्या हातांना वर उचलत परत जमीनीवर आणा. यामुळे फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. अनेक प्रयत्न करूनही श्वास घेण्यास होत असलेला त्रास कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
(आंबे खाण्याचे गुणकारी फायदे वाचाल; तर लॉकडाऊनमध्येही रोज आंबेच खात बसाल)