Cholesterol : हार्ट अटॅकचं कारण ठरणारं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं? जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:18 PM2022-04-09T12:18:16+5:302022-04-09T12:18:26+5:30

Cholesterol : गुड कोलेस्ट्रॉल कोशिकांचं निर्माण आणि व्हिटॅमिन व इतर हार्मोन्स तयार करण्यासाठी महत्वाचं असतं तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

Cholesterol : A few changes in your diet can reduce cholesterol and improve your heart health | Cholesterol : हार्ट अटॅकचं कारण ठरणारं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं? जाणून घ्या उपाय

Cholesterol : हार्ट अटॅकचं कारण ठरणारं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं? जाणून घ्या उपाय

Next

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणं आजकाल गंभीर समस्या बनली आहे. आपल्याकडून खाल्ल्या जाणाऱ्या अनहेल्दी पदार्थांमुळे आणि बदलत्या सुस्त जीवनशैलीमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत आहे. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं एक गुड आणि एक बॅड. गुड कोलेस्ट्रॉल कोशिकांचं निर्माण आणि व्हिटॅमिन व इतर हार्मोन्स तयार करण्यासाठी महत्वाचं असतं तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

बॅड कोलेस्ट्रॉलने येऊ शकतो हार्ट अटॅक

बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकचा आणि स्ट्रोकचा धोका जास्त वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्तप्रवाहाचा मार्ग ब्लॉक करतं. ज्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन हळुवार होऊ शकतं. जर तुम्ही स्मोकिंग करत असाल आणि हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसचे रूग्ण असाल तर हा धोका आणखी जास्त वाढतो. अशात शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रोटीन फायदेशीर ठरतात हे जाणून घेऊ.

डाएटमध्ये डाळींचा करा समावेश

सर्वातआधी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करा ज्यांनी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर निघेल. यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये डाळींचा समावेश करावा लागेल. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण फार कमी असतं. यात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या फायबरचं प्रमाण जास्त असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं असतं. अशात बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी डाळी फायदेशीर ठरू शकतात.

बदामही फायदेशीर

फार कमी लोकांना माहीत आहे की, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम हा रामबाण उपाय ठरू शकतो. बदाम कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक चांगलं आणि हेल्दी ड्राय फ्रूट आहे. यात हेल्दी फॅट असतं. जे हृदयाला चांगलं ठेवतं.

ओट्सचा फयदा

त्यासोबतच जर तुम्हाला वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर आहारात ओट्सचा समावेश करा. ओट्सचं नियमित सेवन केलं तर कोलेस्ट्रॉल कमी होतं. सोबतच शरीराला इतरही आरोग्यदायी फायदे मिळतात. अशात ओट्सचा आहारात समावेश करा.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलसंबंधी समस्या असेल आणि हे उपाय करायचे असतील तर आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Web Title: Cholesterol : A few changes in your diet can reduce cholesterol and improve your heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.