सावधान! हृदयाचे ठोके थांबवू शकतं नसांमध्ये जमा असलेलं कॉलेस्ट्रॉल, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 11:12 AM2020-02-09T11:12:44+5:302020-02-09T11:33:11+5:30
आरोग्यासंबंधी समस्या या मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना त्याची कारणं जाणून घेणं.
आरोग्यासंबंधी समस्या या मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना त्याची कारणं जाणून घेणं. हे देखील तितंकच महत्वाचं आहे. त्यापैकीच एक म्हणजे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण व्यवस्थित नसेल तर वेगवेगळ्या प्रकराचे आजार होऊ शकतात.शरीरात एकूण कॉलेस्ट्रॉल 200 mg/dL यापेक्षा कमी असायला हवं. एचडीएल कोलेस्ट्रॉल 40 mg/dL पेक्षा अधिक असायला हवं. याचं प्रमाण कमी जास्त झाल्यास मोठ्या आजारांचा धोका असू शकतो.
एशियन हार्ट इंस्टीट्यूटमधील तज्ञांच्यामते शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल जमा असतं. कॉलेस्ट्रॉलमुळे झाल्यामुळे शरीरात रक्त वाहिन्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते. एनजाइना (Angina) हा आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. हे स्ट्रोकच्या समस्येचं कारण सुद्धा असू शकतं.
तज्ञांच्यामते कॉलेस्ट्रॉल वाढण्यामुळे डायबिटीस, रक्तदाबाच्या समस्या तसंच वेगवेगळे गंभीर आजार होण्याची समस्या उद्भवत असते. हार्ट कॉलेस्टॉलची समस्या उद्भवल्यास हृद्यविकाराचा झटका येण्याची सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया ही अतिशय संथगतीने होत असते. ब्लॉकेज सुद्धा होत असतात.
रक्तात मोठ्या प्रमाणावर कॉलेस्ट्रॉल असल्यामुळे Homozygous Familial Hypercholesterolemia हा आजार होऊ शकतो. डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळटपणा येतो. जे लोक लठ्ठपणाचे शिकार अशा लोकांना कॉलेस्ट्रॉल वाढून डायबिटीस होण्याचा धोका असतो. रक्ताची तपासणी करून तुम्ही कॉलेस्टॉल नियंतत्रणात करू शकतात. कॉलेस्ट्रॉल प्रामुख्याने लिव्हरमध्ये असलेल्या एजांईम्स द्वारे सक्रिय होत असते. आपण आहारात ज्या गोष्टींचे सेवन करत असतो. यावर शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. कॉलेस्ट्रॉचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात मासांहाराचे प्रमाण कमी करायला हवं.
अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढतं तसंच कॉलेस्ट्रॉल वाढतं. ज्या लोकांना रात्री उशीरापर्यत जेवण्याची सवय असते. त्यांना या आजारांचा धोका जास्त जाणवतो. रात्री उशीरापर्यंत जागून काम केल्याने किंवा रात्री उशीरा जेवल्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढतं. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरेजचं आहे. ( हे पण वाचा-तुम्ही दररोज कोणते पदार्थ खाता? 'या' पदार्थांमुळे होऊ शकता हृदयरोगाचे शिकार!)
आहारात तेलयुक्त पदार्थांचा समावेश कमी प्रमाणात करा.
मासांहार करणं टाळा, संतुलित आहार घ्या.
रात्री उशीरापर्यंत काम करू नका.
जेवणाची वेळ चुकवून जास्त वेळ उपाशी राहणं टाळा.
ताण-तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-जिमला जात असाल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो 'या' गंभीर व्हायरसचा आणि इन्फेक्शनचा धोका!)