नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खास ऑयुर्वेदिक ड्रिंक, हृदयरोगचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 01:23 PM2022-12-22T13:23:17+5:302022-12-22T13:24:27+5:30

Ayurvedic Drink To Open Blocked Arteries: कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक जमा होतो आणि याने रक्तप्रवाह ब्लॉक होतो. याने रक्तप्रवाह योग्यपणे होत नाही. त्यामुळे रक्तासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो.

Cholesterol : Ayurvedic drink to open blocked arteries with bad Cholesterol | नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खास ऑयुर्वेदिक ड्रिंक, हृदयरोगचा टळेल धोका

नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खास ऑयुर्वेदिक ड्रिंक, हृदयरोगचा टळेल धोका

Next

Ayurvedic Drink To Open Blocked Arteries: रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं एक चांगली स्थिती नाही. कारण याने दुसऱ्या अनेक गंभीर समस्या तयार होतात. खासकरून हृदयरोगांचा धोका अधिक राहतो. याचा आपली खराब लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे हे होतं. भारतात तेलकट पदार्थ खाण्याची खूप चलन आहे. ज्याचे खूप गंभीर परिणाम होतात. सोबतच ज्या लोकांची फिजिकल अॅक्टिविटी कमी असते तेही हाय कोलेस्ट्रॉलचे शिकार होतात. पण एक खास आयुर्वेदिक ड्रिंक प्यायल्याने तुमच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होतात.

आर्टरीज का होतात ब्लॉक?

कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक जमा होतो आणि याने रक्तप्रवाह ब्लॉक होतो. याने रक्तप्रवाह योग्यपणे होत नाही. त्यामुळे रक्तासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. हेच कारण आहे की, कोलेस्ट्रॉलची टेस्ट करून ते संतुलित आहे की नाही चेक करावं. एकदा जर तुमच्या आर्टरी ब्लॉक होतात तेव्हा तुम्हाला उपचाराची गरज पडते. त्यामुळे तुम्हाला ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी हा घरगुती उपाय करणं गरजेचं आहे.

एका खास आयुर्वेदिक ड्रिंकच्या माध्यमातून रक्तात जमा बॅड कॉलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. ज्यामुळे आर्टरीजमध्ये ब्लॉकेज मोकळ्या होतात. हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी केवळ 5 गोष्टी लागतात. 

सामग्री 

- लसणाचा रस 1 कप

- आल्याचा रस 1 कप

- सफरचंदचा रस 1 कप

- लिंबाचा रस 1 कप

- मध 3 कप

कसं कराल तयार?

- हे ड्रिंक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी चारही रस एका पॅनमध्ये टाका.

- गॅस सुरू करा आणि हे मिश्रण हलक्या आसेवर गरम करा.

- जेव्हा रस 3 चतुर्थांश शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण एका कटोऱ्यात काढा.

- हे मिश्रण थंड झाल्यावर यात कच्च मध टाकून चांगलं मिक्स करा.

- नंतर हे मिश्रण एअर टाइट जार किंवा बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये स्टोर करा. 

- या मिश्रणाचं रोज सकाळी एक चमचा रिकाम्या पोटी सेवन करा. काही दिवसांनंतर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होईल.

Web Title: Cholesterol : Ayurvedic drink to open blocked arteries with bad Cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.