शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:19 PM2022-11-09T12:19:07+5:302022-11-09T12:19:29+5:30
High Cholesterol causes : काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे?
High Cholesterol causes : शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका वाढणं. अशात तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. या स्थितीतून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी डाएटमध्ये बदल करावा लागेल. कारण काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काय करू नये? चला जाणून घेऊ याचं उत्तर.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी?
सर्वातआधी तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आहारात काय घेत आहात? कारण ज्याप्रकारचा आहार तुम्ही घ्याल शरीरावर त्याच प्रकारचा प्रभाव पडणार. जर तुम्ही जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ खात असाल तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. याने तुम्हाला फायदा मिळेल.
लठ्ठपणा
तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात तुम्ही वजन वाढू देऊ नका. सतत एक्सरसाइज करा. जेणेकरून अशाप्रकारचे आजार तुम्हाला होऊ नये. वजन कमी करण्यासाठी आहार आणि एक्सरसाइज दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
मद्यसेवन आणि धुम्रपान
जर तुम्ही मद्यसेवन करण्यासोबतच स्मोकिंगही करत असाल तर तुम्ही आरोग्यासोबत खेळ करत आहात. कारण सर्वांनाच माहीत आहे की, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशात या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. असं केलं नाही तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता दाट असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.
जंक फूड खाणं
जर टेस्टमध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं दाखवलं असेल तर जंक फूड्स खाणं लगेच सोडा. डॉक्टरांनुसार, पिझ्झा, मोमोज, चाउमीन, बर्गरसारखे जंक फूड सडलेल्या मैद्यापासून तयार केले जातात. ज्यामुळे आरोग्याला गंभीर नुकसान होतं. त्याशिवाय प्रोसेस्ड फूड्स, पॅकेज्ड फूड्स आणि मीटमुळेही कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर हे फू़ड्स खाणं सोडा.