Weight loss tips: 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतील झटपट, लवकर सेवन सुरु करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:31 PM2022-05-23T12:31:14+5:302022-05-23T12:35:36+5:30

योग्य व्यायामाच्या जोडीला चांगले डिटॉक्स ड्रिंक्स मिळाले तर कोलेस्ट्रॉल लवकर व झटपट कमी होऊ शकते.

cholesterol detox drinks will help you to reduce cholesterol | Weight loss tips: 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतील झटपट, लवकर सेवन सुरु करा

Weight loss tips: 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतील झटपट, लवकर सेवन सुरु करा

googlenewsNext

कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकसारख्या समस्या निर्माण होतात. जीवनशैलीत बदल करुनही याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. पण योग्य व्यायामाच्या जोडीला चांगले डिटॉक्स ड्रिंक्स मिळाले तर कोलेस्ट्रॉल लवकर व झटपट कमी होऊ शकते. हे डिटॉक्स ड्रिंक्स कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्स सहज उपलब्ध होतात.

ग्रीन टी
मेटाबॉलिज्म बुस्ट करणारी ग्रीन टी वजन तर कमी करतेच पण कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात ठेवते. रोज सेवन केल्यामुळे याचे परिणामही लवकर दिसु लागतात. ग्रीन टीमध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते.

टॉमेटोचा ज्युस
टॉमेटोच्या ज्युसच्या सेवनाने कोलस्ट्रॉल मोठ्या प्रमाणावर कमी होते. याचे नियमित सेवन केल्याने भरपूर फायदा होतो. मात्र काही गंभीर आजाराच्या रुग्णांनी याचे सेवन करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ओट मिल्क
ओट मिल्कमध्ये बिटा ग्लुकन नामक गुणधर्म असतो. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास बऱ्याच अंशी मदत होते.

लक्षात घ्या, कोलेस्ट्रॉल... गुड कोलेस्ट्रॉल व बॅड कोलेस्ट्रॉल या दोन प्रकाराचे असते. शरिरात बॅड कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशावेळी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

Web Title: cholesterol detox drinks will help you to reduce cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.