Cholesterol Myths: कोलेस्ट्रॉल संबंधित लोकांमध्ये हे 3 गैरसमज, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:11 AM2023-07-18T09:11:40+5:302023-07-18T09:13:12+5:30
Cholesterol Myths: हाय कोलेस्ट्रॉल सुद्धा एक मोठी समस्या आहे. शरीरात वाढत असलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
Cholesterol Myths: अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. भारत डायबिटीससारख्या आजाराची राजधानी झाला आहे. त्यासोबतच बीपी आणि हृदयासंबंधी इतर आजार होत आहेत. हाय कोलेस्ट्रॉल सुद्धा एक मोठी समस्या आहे. शरीरात वाढत असलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
निरोगी आणि फीट राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सामान्य ठेवणं फार गरजेचं आहे. पण आजकाल लोक कोलेस्ट्रॉलकडे बरंच दुर्लक्ष करतात. अशात लोकांना कोलेस्ट्रॉलच्या काही गैरसमजांबाबत माहीत असलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल संबंधी 3 गैरसमजांबाबत सांगणार आहोत.
1) बारीक लोकांना कोलेस्ट्रॉल होत नाही -
अनेकदा असं म्हटलं जातं की, केवळ लठ्ठ लोकांनाच कोलेस्ट्रॉलची समस्या होते आणि बारीक किंवा सडपातळ लोकांना ही समस्या होत नाही. पण सत्य तर हे आहे की, कुणी लठ्ठ असो वा बारीक कोलेस्ट्रॉलची समस्या कुणालाही होऊ शकते. कोणत्याही व्यक्तीच्या वयाचा, लिंगाचा किंवा वजनाचा कोलेस्ट्रॉलशी काही संबंध नाही. कोलेस्ट्रॉलची समस्या तुम्हाला कोणत्याही वयात होऊ शकते.
2) सगळ्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल नुकसानकारक
मुळात कोलेस्ट्रॉल आपल्या जेवणाचा महत्वाचा भाग असतो आणि आपण ते टाळू शकत नाही. यात वेगवेगळे पोषक तत्व असतात जे इतर पोषक तत्वांसोबत मिळून शरीराला फायदे देतात. भलेही हाय कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्या होतात, पण शरीरात याचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. शरीराचं संतुलन कायम ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे.
3) सगळ्यांना कोलेस्ट्रॉलची एकसारखी गरज
अनेक लोकांना कोलेस्ट्रॉलच्या सेवनाबाबत हा गैरसमज असतो. प्रत्येकाच्या शरीराची संरचना आणि पचनाची क्षमता वेगवेगळी असते. जे लोक जास्त फिजिकल अॅक्टिविटीज करतात, त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची डिमांड जास्त असते. त्यासोबतच ज्यांच्या परिवारात डायबिटीसचा इतिहास आहे त्या लोकांनी कोलेस्ट्रॉलचं कमी सेवन करावं. तसेच ज्या लोकांना आरोग्यासंबंधी काहीच समस्या नाही ते थोडं जास्त कोलेस्ट्रॉल घेऊ शकतात.