Cholesterol Reduce Tips: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं? हार्ट अटॅकचा धोकाही होणार कमी...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:39 PM2022-05-11T14:39:09+5:302022-05-11T14:39:33+5:30
Cholesterol Reduce Tips: सर्वांनाच माहीत आहे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक गुड आणि एक बॅड. जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर समस्या वाढू लागतात.
Cholesterol Reduce Tips: बदलत्या लाइफस्टाईलमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल बिघडणं कॉमन होत चाललं आहे. अशात अनेकांचे हार्ट धोक्यात राहतात. शरीरात जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. या स्थितीतून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनाच माहीत आहे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक गुड आणि एक बॅड. जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर समस्या वाढू लागतात. अशात कोणत्या गोष्टींनी कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं हे माहीत असणं फार महत्वाचं आहे.
आहारात करा लसणाचा समावेश
अनेकांना माहीत नसतं की तुमच्या किचनमध्ये असलेला लसूण तुमच्या खूप कामी येतो. हे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित राहतं. मुख्यपणे शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचा फार उपयोग होतो.
ग्रीन टी ने मिळते मदत
कमीच लोकांना माहीत आहे की, ग्रीन-टी वजन कमी करण्यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही ग्रीन टी चं तज्ज्ञांच्या सल्ल्याने सेवन कराल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
हळदीचं दूध
हळदीचं दूध तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतं. म्हणजे असे लोक ज्यांना नेहमीच काहीना काही आजार होत असतात. त्यांनी आपल्या डाएटमध्ये हळदीच्या दुधाचा समावेश करावा. याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. या दुधात असे गुण असतात ज्याने सहजपणे कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं जाऊ शकतं.
अळशीच्या बीया
कमीच लोकांना माहीत आहे की, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अळशीच्या बीया फार फायदेशीर असतात. या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि लिनोलेनिक अॅसिड असतं. जे सरळ सरळ बॅड कोलेस्ट्रॉलवर वार करतं आणि हे फार प्रभावी असतं.