Cholestrol वाढलं असेल तर अजिबात करू नका या चुका, पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:51 AM2022-08-29T10:51:51+5:302022-08-29T10:52:04+5:30

Cholesterol Mistakes : चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि लाइफस्टाईलमुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. यादरम्यान तुम्ही जर काही चुका केल्या तर समस्या आणखी जास्त वाढते.

Cholestrol level increase : You should not do these mistakes in bad cholestrol | Cholestrol वाढलं असेल तर अजिबात करू नका या चुका, पडेल महागात

Cholestrol वाढलं असेल तर अजिबात करू नका या चुका, पडेल महागात

Next

Cholesterol Mistakes : कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने तुम्हाला स्ट्रोक, टाइप 2 डायबिटीस आणि हार्ट अटॅकची समस्या होऊ शकते. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉल प्रभाव थेट आपल्या हार्टवर पडतो. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि लाइफस्टाईलमुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. यादरम्यान तुम्ही जर काही चुका केल्या तर समस्या आणखी जास्त वाढते. अशात चला जाणून घेऊ जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आपण काय चुका करू नये.

अनहेल्दी पदार्थ खाणं

जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल आणि तुम्ही तरीही अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा पॅकेज्ड फूड, मीट आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नये. हे पदार्थ खाल्ले तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणखी वाढू शकतं. 

एक्सरसाइज न करणं

जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल तुमच्यासमोर आणखी समस्या निर्माण होऊ शकते. एक्सरसाइज केल्याने तुमच्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. जेव्हाही कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तेव्हा एक्सरसाइज नक्की करा.

मद्यसेवन 

मद्यसेवन काही लोकांसाठी सवय बनते. जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल आणि तुम्ही तेव्हाही  मद्यसेवन करत असाल तर हे तुमच्यासाठी फारच नुकसानकारक आहे. जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर मद्यसेवन पूर्णपणे बंद करा.

स्मोकिंग

स्मोकिंग केल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. याने हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. अशात शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी स्मोकिंग पूर्णपणे बंद करा.

Web Title: Cholestrol level increase : You should not do these mistakes in bad cholestrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.