बॅड कोलेस्ट्रॉल लगेच होईल कमी, रोज खा या खास बियांची चटणी; जाणून घ्या कशी बनवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:48 AM2024-06-26T10:48:16+5:302024-06-26T10:49:05+5:30

अळशीच्या बियांमध्ये ओमेगासारखं हेल्दी फॅट भरपूर असतं जे मेंदूसोबत हृदयासाठी चांगलं असतं. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठीही अळशीच्या बीया फायदेशीर ठरतात.

Chutney of falx seeds to control bad cholesterol level | बॅड कोलेस्ट्रॉल लगेच होईल कमी, रोज खा या खास बियांची चटणी; जाणून घ्या कशी बनवाल!

बॅड कोलेस्ट्रॉल लगेच होईल कमी, रोज खा या खास बियांची चटणी; जाणून घ्या कशी बनवाल!

Flax seeds for cholesterol control: शरीरात जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल भरपूर लोकांना होत आहे. शरीरात जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर सगळ्यात जास्त धोका हार्ट अटॅकचा असतो. कारण कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. अशात कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी अळशीच्या बीया फार फायदेशीर मानल्या जातात. अळशीच्या बियांमध्ये ओमेगासारखं हेल्दी फॅट भरपूर असतं जे मेंदूसोबत हृदयासाठी चांगलं असतं. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठीही अळशीच्या बीया फायदेशीर ठरतात.

बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यासाठी अळशीच्या बियांची चटणी खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात ही चटणी कशी बनवावी, याचं सेवन कसं करावं आणि याचे काय फायदे होतात जे जाणून घेऊया.

अळशीच्या बियांचे फायदे

हृदयासाठी फायदेशीर

अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. हे ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयावरही दबाव कमी पडतो. या बियांनी कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. अशात तुम्हाला हृदयासंबंधी समस्यांचा धोकाही कमी राहतो.

डायजेस्टिव पॉवर वाढते

अळशीच्या बियांमध्ये डायटरी फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचन तंत्र चांगल्या पद्धतीने काम करण्यास मदत मिळते. तसेच अळशीमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. ज्यामुळे पोट साफ राहतं आणि पोटासंबंधी समस्याही होत नाहीत.

वजन कमी होतं

फायबर भरपूर असल्याने अळशी बियांचं सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं आणि जास्त भूक लागत नाही. अशात तुम्ही अनावश्यक काही खात नाही आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

अळशीची चटणी कशी बनवाल?

एका वाटीमध्ये अळशीच्या बीया घ्या आणि त्यात अर्धा लीटर पाणी टाकून १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर अळशीच्या बीया गाळून वेगळ्या करा. भिजवलेल्या अळशीच्या बीया त्यात थोडं आलं, हिरव्या मिरच्या, एक चमचा धणे टाका. त्यानंतर टेस्टनुसार मीठ आणि अर्धा वाटी दही टाका. हे सगळं मिक्सरमधून बारीक करा. अळशीची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही दुपारी जेवणासोबत खाऊ शकता.

Web Title: Chutney of falx seeds to control bad cholesterol level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.