हाय कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी करतो 'हा' एक मसाला, हार्ट अटॅकचा टळेल धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:37 PM2024-10-24T16:37:49+5:302024-10-24T16:39:27+5:30
How To Reduce Extra Cholesterol: तुमच्या किचनमध्ये एक असा मसाला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करू शकता.
How To Reduce Extra Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल आजकाल एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका वाढतो. मात्र, तुमच्या किचनमध्ये एक असा मसाला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करू शकता. या मसाल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल तर कमी होईलच, सोबतच हृदयही निरोगी राहतं.
कोलेस्ट्रॉल कमी करणारा मसाला!
दालचीनी हा एक असा मसाला आहे ज्याने जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-मायक्रोबिअल गुणही आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या नियमित सेवनाने हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.
दालचीनी कशी कमी करते कोलेस्ट्रॉल?
दालचीनीच्या सेवनाने शरीरातील लिपिड्स कंट्रोल होतं. याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होतं आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
दालचीनीचे इतर फायदे
ब्लड शुगर कंट्रोल करणे
दालचीनीचं सेवन डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतं. कारण याने शरीरात शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढते. ज्यामुळे शुगरला एनर्जीमध्ये बदलण्याची प्रक्रिया सोपी होते.
वजन कमी करण्यास मदत
दालचीनीच्या सेवनाने मेटाबॉलिज्म मजबूत होतं. ज्यामुळे शरीरातील फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगाने होते. यामुळे भूक कंट्रोल होते व वजन कमी करण्यास मदत मिळते.