मालवणी-दहीसरमधील सिमेंट कारखाने बंद करा

By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:20+5:302015-08-28T23:37:20+5:30

(बातमीचे फोटो लोकमत आयडीवर आहेत)

Close the cement factories in Malvani-Dahisar | मालवणी-दहीसरमधील सिमेंट कारखाने बंद करा

मालवणी-दहीसरमधील सिमेंट कारखाने बंद करा

Next
(ब
ातमीचे फोटो लोकमत आयडीवर आहेत)
..................................................
मालवणी-दहीसरमधील सिमेंट कारखाने बंद करा
मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी आणि दहिसर पूर्वेकडील रावळपाडा येथील लोकवस्तीत असलेले सिमेंट कारखाने कायम स्वरूपी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सायन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वॉचडॉग फांऊडेशन, सोल(सेव्ह अवर लॅन्ड), मार्वे रोड रेसिडंटस असोसिएशन, प्रभात नगर वेल्फेअर सोसायटी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मंडळाचे विभागीय अधिकारी दिलीप खेडेकर यांना सिमेंट कारखाने कायमस्वरुपी बंद करण्याबाबतचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.
मालवणी येथील तीन सिमेंट कारखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय शाळकरी मुलांना दमा आणि अस्थमाचा त्रास जाणवू लागला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी तीन सिमेंट कारखान्यांच्या विरोधात जुलै महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा हे कारखाने बंद करण्याची नोटीस मंडळाने जारी केली होती. त्यानुसार कारखाने काही काळ बंदही झाले होते. मात्र पुन्हा बंद कारखाने सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. तर रावळपाडा येथील सिमेंट कारखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरणालाही हानी पोहचत आहे, अशी भिती वॉचडॉग फांऊडेशनचे ग्राँडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Close the cement factories in Malvani-Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.