मोहरीच्या तेलात लवंग टाकून 'असा' करा वापर, शरीरातील 'या' समस्या लगेच होतील दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:37 AM2024-10-22T10:37:30+5:302024-10-22T10:38:25+5:30
Benefits of Cloves With Mustard Oil: या मिश्रणाने शरीरासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. खासकरून हिवाळ्यात तर हे मिश्रण अधिक फायदेशीर ठरतं.
Benefits of Cloves With Mustard Oil: मोहरीचं तेल बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. बरेचजण जेवणही यातच बनवतात. या तेलाने टेस्ट तर वाढतेच, सोबतच हे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. तसेच लवंगही खूप फायदेशीर असते. वेगवेगळ्या उपचारांमध्ये लवंगचा वापर केला जातो. अशात जर तुम्ही मोहरीचं तेल आणि लवंगचा एकत्र वापर केला तर आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात. या मिश्रणाने शरीरासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. खासकरून हिवाळ्यात तर हे मिश्रण अधिक फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ याने कोणत्या समस्या दूर होतात आणि याचा वापर कसा करावा.
मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावण्याचे फायदे
1) संधिवात आणि सूज
मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्याने संविधाव आणि सूज दूर होण्यास मदत मिळते. लवंगमधील यूजेनॉल तत्वात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यासोबतच मोहरीचं तेल गरम असल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत करण्यास मदत मिळते. ज्यामुळे वेदनाही कमी होतात.
2) दातांचं दुखणं होतं दूर
लवंगचा वापर दातांचं दुखणं दूर करण्यासाठी फार आधीपासून केला जात. अशात मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून हिरड्यांवर लावल्याने दातांसंबंधी दूर करण्यास मदत मिळते. या उपायाने दातांवरील इन्फेक्शन आणि हिरड्यांवरील सूजही दूर होते.
3) सर्दी-खोकला दूर होतो
सर्दी, खोकला आणि नाक बंद होणे अशा समस्या दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्यास खूप फायदा मिळतो. यासाठी मोहरीच्या तेलात लवंग हलकी गरम करा. हे तेल छाती आणि पाठीवर लावून मालिश करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि तुमच्या समस्या दूर होतील.
4) त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव
लवंगमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात, जे त्वचेचं इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत करतात. मोहरीचं तेलही अॅंटी-सेप्टिक गुणांनी भरपूर असतं. ज्याने त्वचा आणि साफ आणि हेल्दी राहते. हे मिश्रण त्वचेवर लावल्याने खाज, जळजळ आणि त्वचेच्या इतरही समस्या दूर होतात.
5) केसांची समस्या होईल दूर
मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून हे मिश्रण केसांवर लावल्यास केसांची मूळं मजबूती मिळते आणि कोंड्यासारखी समस्याही दूर होते. या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि केसगळतीची समस्या दूर होते.