सर्व त्वचा विकारांवर ‘लवंग तेल’ आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 09:13 AM2017-05-16T09:13:58+5:302017-05-16T14:43:58+5:30

लवंग फक्त खाद्य पदार्थांचाच स्वाद वाढवत नाही तर त्याचे औषधी गुणधर्मदेखील आहेत.

'Clove oil' on all skin disorders is curative! | सर्व त्वचा विकारांवर ‘लवंग तेल’ आहे गुणकारी !

सर्व त्वचा विकारांवर ‘लवंग तेल’ आहे गुणकारी !

googlenewsNext
्वांच्या स्वयंपाकगृहात आढळणारा मसाल्याचा पदार्थ लवंग आपणास माहित असेलच. लवंग फक्त खाद्य पदार्थांचाच स्वाद वाढवत नाही तर त्याचे औषधी गुणधर्मदेखील आहेत. दातदुखी, खोकला आदी समस्यांबरोबरच लवंग तेला वापर सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवरही केला जातो. शिवाय ते एक चांगले ब्युटी प्रॉडक्टदेखील आहे. 

* लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल हे गुण असतात. त्यामुळे याच्या नियमित वापराने अनेक त्वचाराविकारांवर फायदा होतो. 

* लवंगाच्या तेलाचा वापर मुरुमांच्या डागांवर नियमित केल्यास डाग निघून जाण्यास मदत होते. 

* लवंगाच्या तेलाने रोज रात्री झोपताना मसाज केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

* केस पांढरे होणे, केस गळणे आदी समस्यांवरही लवंगाचे तेल गुणकारी आहे. यासाठी नारळाच्या तेलात लवंगाचे तेल मिसळून लावा. कारण नुसत्या लवंग तेलाचा केसांवरील वापर नुकसानकारक ठरु शकतो. 

Web Title: 'Clove oil' on all skin disorders is curative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.