गवाराच्या शेंगांचे आरोग्यदायी फायदे वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:23 AM2018-09-13T10:23:25+5:302018-09-13T10:24:45+5:30
गवाराच्या शेंगांची भाजी खाणे अनेकांना पसंत नसतं. तुम्हीही गवाराच्या शेंगांची भाजी बघताच नाक मुरडत असाल तर आजपासून असे करणे बंद करा.
गवाराच्या शेंगांची भाजी खाणे अनेकांना पसंत नसतं. तुम्हीही गवाराच्या शेंगांची भाजी बघताच नाक मुरडत असाल तर आजपासून असे करणे बंद करा. कारण गवाराच्या शेंगांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. कदाचित हे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही या भाजीला कधीच नाही नाही म्हणणार.
गवाराच्या शेंगांमध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक अॅसिड, मिनरल्स, फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम, व्हिटॅमिन के, सी, ए आणि कार्बोहायड्रेट सारखे पोषक तत्व आढळतात. या शेंगांची भाजी तुमच्या हाडांना मजबूत करण्यास मदत करते. तसेच या कॅलरी कमी असल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. इतकेच नाही तर ही भाजी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ काय काय आहेत या भाजीचे फायदे...
१) वजन कमी करण्यास मदत
भलेही या शेंगांची भाजी तुम्हाला आवडत नसेल पण ही या शेंगा वाढलेल्या वजनाने हैराण असलेल्यांसाठी वरदान आहे. या शेंगांमध्ये फार कमी कॅलरी असतात, त्यामुळे वजन करण्यास याने मदत मिळते. जर तुम्ही डाएटवर आहात, तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यात वजन कंट्रोल करण्याची क्षमता आहे.
२) ब्लड शूगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत
डायबिटीजच्या रुग्णांनी या शेंगांची भाजी आवर्जून खावी. यात ग्लायकोनुट्रीन्ट्स तत्व असतं, जे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं.
३) ब्लड सर्कुसेलन सुधारतं
या हिरव्या शेंगांमध्ये आयर्न अधिक प्रमाणात असल्याने याची भाजी खाल्याने शरीरात हिमोग्लोबिन लेव्हल वाढते. त्यासोबतच यात असलेल्या फायटोकेमिकल्सने ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासही मदत मिळते.
४) हाडे होतात मजबूत
यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच यातील फॉस्फोरसने हाडे निरोगी राहतात.
५) तणाव आणि चिंता दूर होते
गवाराच्या शेंगांमध्ये हायपोग्लाइसेमिक तत्व नसांना शांत ठेवण्यास मदत करतात. यात चिंता, तणाव कमी करण्यास आणि व्यक्तीला मानसिक रुपाने शांत करण्याची क्षमता असते.
६) हृदय निरोगी राहतं
गवाराच्या शेंगांचा रस शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यातील फायबर, पोटॅशिअम आणि फोलेट हृदयाशी संबंधित वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात.