ड्रेस घट्ट होतो म्हणून निराश होणं सोडा, नारळाच्या तेलाचा फंडा वापरून वजन 'असं' कमी करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:17 AM2020-03-03T11:17:15+5:302020-03-03T11:30:14+5:30
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. कारण त्यामुळे शरीरावरची चरबी वाढणार नाही.
नारळाच्या तेलाचा खाद्यपदार्थांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही पण नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमचं वजनसुद्धा कमी करू शकता. डाएट करून किंवा जिमला जाऊन सुद्धा तुम्ही बारिक होत नसाल किंवा वजन कमी होण्याचं नाव घेत नसेल तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करून वजन सुद्धा कमी करू शकता.
चला तर मग जाणून घेऊया कसं करायचं वजन कमी. इतर तेलांच्या तुलनेत नाराळाचं तेल सुद्धा तितंकचं चविष्ट असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. कारण त्यामुळे शरीरावरची चरबी वाढणार नाही.
कुकिंग ऑईलचा असा करा वापर
नारळाचे तेल फॅट्स बर्न करण्यासाठी आवश्यक असतं. याचा आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे. याशिवाय वनस्पती तेल, बटर यांचा वापर खाण्यासाठी करू नका. नारळाचं तेल हे प्राकृतीत स्वरूपातून थर्मोजेनिक असं आहे. म्हणूनचं हे तेल फॅट्स जळण्याच्या प्रकियेला चालना देत असतं. त्यात समाविष्ट असलेलं एमसीटी तेल सुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते आणि तुम्ही निरोगी राहते.
कॉफीत नारळाचं तेल घाला
वजन कमी करण्यासाठी जी पेय घ्यायला हवीत ती आपल्या आहारात नसतात. त्यामुळे कॉफी प्यायला जर तुम्हाला आवडत असेल तर नारळाचं तेल किंवा तुप अशा शरीरासाठी पौष्टीक असलेल्या पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. त्यामुळे एक हेल्थी ड्रिंक तुम्हाला पिता येईल. सतत लागणारी भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी तसचं पचनक्रिया सुरळित करून पोट साफ होण्यासाठी सुद्धा हे ड्रिंक फायदेशीर ठरतं. नारळाच्या तेलास आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळल्याने आपले शरीर नरम राहील.
याशिवाय ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास आरोग्य चांगलं राहील. आहारातील कॅल्शियच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होतात आणि दुखू लागतात. नारळाच्या तेलात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे तुमच्या हाडांचा विकास होतो. हाडे मजबूत झाल्यामुळे हाडांच्या समस्या कमी होतात. ( हे पण वाचा- ...तर लग्नात बारीकही दिसाल आणि खुलूनही; टॉप १० टिप्स)
नारळाच्या तेलाचा वापर करताना अशी घ्या काळजी
ज्याप्रमाणे नारळाच्या तेलात वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारे गुण असतात. त्याचप्रमाणे इतर फॅट्स सु्द्धा असतात. नारळाच्या तेलात मेडियम-चेन ट्राईग्लिसराइड ऑईल (MCT) चे प्रमुख स्त्रोत आहे. कॅलरी काऊंटवर जर आपण व्यवस्थित लक्ष ठेवलं तर वजन सोप्या पद्धतीने कमी करू शकतो. रोज जर तुम्ही नारळाच्या तेलातून ११० ते १२० कॅलरीज् घेतल्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. ( हे पण वाचा-China Coronavirus: कोरोना व्हायरसचे भारतात ५ रुग्ण; बचावासाठी उचला 'ही' १० पाऊले, अन्यथा...)