वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:37 PM2022-07-21T17:37:37+5:302022-07-21T17:38:15+5:30

लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

coconut water is extremely beneficial for your health | वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

वजन कमी करण्यासाठी 'हे' पेय आहे फारच फायदेशीर, पण करा 'अशाप्रकारे' सेवन

googlenewsNext

बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अनुवंशिकता आणि काही आजारांमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटिस (Diabetes) सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. परंतु, पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

नारळाचं अर्थात शहाळ्याचं पाणी (Coconut Water) हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. ``लठ्ठपणा ही आजच्या काळातली सर्वात गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आहारमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. रोज पोषक आहारासोबत नारळाचं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते,`` असं ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस रुग्णालयातील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज (Calories) कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि नैसर्गिक एंझाइम्स (Natural Enzyme) मुबलक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिऊ शकता. परंतु, वजन कमी करण्याच्या उद्देशानं तुम्ही हे नैसर्गिक पेय (Natural Drink) सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे मॉर्निंग सीकनेस आणि हार्टबर्नसारख्या समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पोटाच्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर ठरतं. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह एंजाइम्समुळं पचन आणि मेटाबॉलिझम (Metabolism) उत्तम राहतं. नारळ पाणी प्यायल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जातं आणि हळूहळू वजन कमी होतं.

``रोज नारळ पाणी प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जादायी वाटेल. खरंतर दिवसभरात कोणत्याही वेळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी हे पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम दिसून येतात,`` असं डॉ. यादव यांनी सांगितलं.

Web Title: coconut water is extremely beneficial for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.