कोण म्हणतं कॉफी पिणं ठरतं घातक... आता बिनधास्त घ्या कॉफी; होतात 'हे' फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:28 PM2019-10-02T13:28:43+5:302019-10-02T13:54:34+5:30

कॉफी म्हणजे, आपल्यापैकी अनेकांची एक घट्ट मैत्रीण असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. तुम्ही आतापर्यंत कॉफीबाबत अनेक चांगल्या वाईट गोष्टी ऐकल्या असतीलच. त्यापैकी अनेक कॉफीमध्ये कॅफेन असतं, त्यामुळे जास्त सेवन करून नका किंवा मग कॉफीमुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते, असंही सांगितलं जातं.

Coffee is better for health know the benefits | कोण म्हणतं कॉफी पिणं ठरतं घातक... आता बिनधास्त घ्या कॉफी; होतात 'हे' फायदे

कोण म्हणतं कॉफी पिणं ठरतं घातक... आता बिनधास्त घ्या कॉफी; होतात 'हे' फायदे

googlenewsNext

कॉफी म्हणजे, आपल्यापैकी अनेकांची एक घट्ट मैत्रीण असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. तुम्ही आतापर्यंत कॉफीबाबत अनेक चांगल्या वाईट गोष्टी ऐकल्या असतीलच. त्यापैकी अनेक कॉफीमध्ये कॅफेन असतं, त्यामुळे जास्त सेवन करून नका किंवा मग कॉफीमुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते, असंही सांगितलं जातं. कॉफीवर करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधूनही कॉफीचे आरोग्यासाठीचे चांगले आणि वाईट फायदे समोर आले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला कॉफी प्यायल्याने अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात, याबाबत सांगणार आहोत. अनेक संशोधनांमधूनही वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध झाली आहे. एवढचं नाहीतर अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कॉफीच्या नियमित सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, कॉफी पिण्याचे आकडे पाहिले तर सर्वात जास्त कॉफी पिणारी लोकं अमेरिकेमध्ये असल्याचे समजते. कॉफीचं सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. 

जाणून घेऊया कॉफी प्यायल्याने होणारे फायदे :

  • लठ्ठपणाचा धोका होतो कमी 
  • डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी मदत 
  • लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर 
  • हृदय रोगांपासून बचाव 

 

कॉफी प्यायल्याने लठ्ठपणा राहतो दूर 

हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, दररोज कॉफीचं सेवन केल्याने लठ्ठपणा दूर राहतो. डाएट एक्सपर्ट्सच्या मते, ब्लॅक कॉफीच्या सेवनाने लिव्हरचं आरोग्य राखण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, शरीराची रोगप्रतिकार शक्ती राखण्यासाठीही कॉफी मदत करते. 

ज्या व्यक्ती दररोज कॉफीचं सेवन करतात. ते फॅटी लिव्हरच्या त्रासापासून दूर राहतात. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. 

डायबिटीसचा झोका होतो कमी 

डायबिटीसवर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. एका संशोधनानुसार, दररोज 4 कप कॉफी प्यायल्याने  डायबिटीसचा धोका कमी होतो. कॉफीमध्ये आढळून येणारं तत्व इंसुलिनचं प्रमाण राखण्यासाठी मदत करतात. 

नर्वस सिस्टिमशी निगडीत आजारांचा धोका असतो कमी 

नर्वस सिस्टिमशी निगडीत आजारांचा धोका कॉफी प्यायल्याने कमी होतो. कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण अझिक असतं. जे नर्वस सिस्टिमसाठी फायदेशीर ठरतं. नर्वस सिस्टिम उत्तम असल्याने लठ्ठपणाचा धोका कमी असतो. 

लिव्हरशी निगडीत आजारांचा धोका होतो कमी 

जर तुम्ही दररोज कॉफीचं सेवन करत असाल तर लिव्हरशी निगडीत आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी दररोज दोन कप कॉफी पिणं फायदेशीर ठरतं. 

हृदय रोगांचा धोका होतो कमी 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी कॉफीचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. हृदय रोगांमुळे प्रत्येक वर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. जर तुम्ही दररोज डाएटमध्ये कॉफीचा समावेश करत असाल तर हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. तसेच एखाद्या गोष्टीचं मर्यादेपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकत. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Coffee is better for health know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.