हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:01 AM2019-11-29T10:01:52+5:302019-11-29T10:05:35+5:30
अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं.
(Image Credit : businessinsider.com)
अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. अनेकजण टेस्ट बदलण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कॉफीचं सेवन केलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, जगभरात कॉफी पिण्याचं वाढतं प्रमाण पाहता याने मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या होऊ शकते? नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॉफीचं सेवन केल्याने कार्डिओवस्कुलर म्हणजे हार्ट स्ट्रोक होण्याचा धोका कमी असतो.
हृदयासाठी फायदेशीर कॉफी
(Image Credit : multibriefs.com)
अभ्यासकांना आपल्या रिसर्चमध्ये असं आढळलं की, कॉफी सेवन केल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो आणि याच सिंड्रोममुळे आपल्या शरीरात कार्डिओवस्कुलर डिजीजचा धोका वाढतो. Metabolic Syndrome (Mets) हा हार्ट डिजीज जसे की, हार्ट स्ट्रोकसाठी जबाबदार असतो. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅटेनिया, इटलीच्या अभ्यासकांना असं रिसर्चमध्ये आढळून आलं. कॅटेनिया विश्वविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गिउसेप ग्रोसो यांनी कॉफीचं सेवन आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांच्यात कनेक्शन जाणून घेण्यासाठी हा रिसर्च केला.
टाइप २ डायबिटीसचा धोका कमी
या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्स खासकरून फेनोलिक अॅसिड आणि फ्लेवोनोइडमध्ये असतात. ज्यामुळे जे लोक कमी प्रमाणात कॉफीचं सेवन करतात, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.
मृत्यूदरात कमतरता
आपल्या रिसर्चदरम्यान प्राध्यापक ग्रोसो यांना असंही आढळलं की, ज्या क्षेत्रांमध्ये कॉफी कमी प्रमाणात घेतली जाते, तिथे मृत्यूदर फार कमी असतो. हे तथ्य तपासून बघण्यासाठी ग्रोसो यांनी स्पेनच्या टॉलेडो युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक ऐस्टेफेनिया यांच्या रिसर्च डेटाची मदत घेतली.
(Image Credit : mdlinx.com)
हा रिसर्च १३व्या यूरोपियन न्यूट्रिशन कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आला. ही कॉन्फरन्स फेडरेशन ऑफ यूरोपियन न्यूट्रिशन सोसायटीज द्वारे आयरलॅंडच्या डबलिनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या रिसर्चमध्ये २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्याकडून कलेक्ट करण्यात आलेल्या डेटामधून असा निष्कर्ष निघाला की, दिवसातून एक ते चार कप कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो.