हार्ट अटॅकचा धोका कमी करते कॉफी, जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:05 PM2024-09-21T13:05:19+5:302024-09-21T13:06:08+5:30
एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कॉफी प्यायल्याने डायबिटीस आणि हार्ट डिजीजसंबंधी आजारांचा धोका ५० टक्के कमी होऊ शकतो.
Coffee For Heart: जास्तीत जास्त लोक आपल्या दिवसाची सुरूवात गरमागरम कॉफीने करतात. एक कप कॉफीने त्यांचा आळसही दूर होतो आणि फ्रेशही वाटतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कॉफी प्यायल्याने डायबिटीस आणि हार्ट डिजीजसंबंधी आजारांचा धोका ५० टक्के कमी होऊ शकतो. यासाठी रोज दोन ते तीन कप कॉफी किंवा २०० ते ३०० मिलिग्रॅम कॅफीनचं सेवन केल्याने कार्डियोमेटाबोलिक मल्टीमॉर्बिडिटीचा धोका कमी करण्यास मदत मिळते. हा रिसर्च जर्नल ऑफ क्लीनिकल एंडोक्रिनोलॉजी अॅन्ड मेटाबॉलिज्ममध्ये प्रकाशित झाला आहे. या लेखामध्ये कॉफी पिण्याचे फायदे, पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ याबाबत जाणून घेणार आहोत.
कॉफी पिण्याचे फायदे
नियमितपणे कॉफी सेवन करण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. कॉफीने मेंदुपासून ते हृदय निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत मिळते.
हृदय आणि शरीर राहतं निरोगी
कॉफीमध्ये हाय अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात ज्यात पॉलीफेनोल्स, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसारखे पोषक तत्व असतात. जे हृदयासोबतच संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. रिसर्चनुसार, कॅफीनच्या वापराने सूज कमी करून कार्डियोमेटाबोलिक हेल्थ सुधारली जाऊ शकते.
मेंदुसाठीही फायदेशीर
कॉफीच्या सेवनाने मेंदुची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रताही वाढते. कॉफीने अल्झायमर आणि पार्किंसन्ससारख्या न्यूरोडीजेनेरेटिव आजाराचा धोका कमी करण्यास मदत मिळते.
स्ट्रेस होईल दूर
कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असतं जे केंद्रीय तंत्रिका तंत्र सक्रिय करण्याचं काम करतं. याने मूड चांगला राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो.
कॉफी पिण्याची योग्य वेळ
कॉफी पिण्याची सगळ्यात चांगली वेळ त्याच्या शरीराच्या सर्कैडियन लयीवर अवलंबून असते. कोर्टिसोल हार्मोन जो लोकांना जागवण्यासाठी आणि सक्रिय ठेवण्यासाठी प्रेरित करतो तो सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान आपल्या पिक पॉईंटवर असतो. त्यामुळे ही योग्य वेळ नाहीये. यादरम्यान कॉफी प्यायल्याने शरीरावर वाईट प्रभाव पडतो.
कॉफीचं सेवन सकाळी ९.३० ते ११.३० वाजेदरम्यान केलं पाहिजे. कारण यावेळी कोर्टिसोलचं प्रमाण कमी होऊ लागतं. जर तुम्हाला दुपारी सुस्ती वाटत असेल तर दुपारी साधारण १ वाजता कॉफीचं सेवन करू शकता. नंतर तुम्ही दुपारी ३ वाजता कॉफी पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला एकाग्रता मिळेल.
कॉफी पिण्याची योग्य पद्धत
रिकाम्या पोटी पिऊ नये
रिकाम्या पोटी कॉफीचं सेवन केल्याने वात-पित्ताचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे कॉफी नाश्ता केल्यावर अर्ध्या तासाने प्यावी.
सायंकाळी उशीरा पिऊ नये
सायंकाळी कॉफीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण यादरम्यान पचनक्रिया स्लो झालेली असते आणि शरीर आरामाच्या स्थितीत असतं. यादरम्यान कॉफीचं सेवन केल्याने शरीराला आराम मिळत नाही. तसेच पनचक्रियाही प्रभावित होते.