कॉफीच्या तत्वांमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 11:13 AM2019-03-20T11:13:56+5:302019-03-20T11:16:16+5:30
कॉफी पिण्याचं चलन जवळपास सर्वच ऑफिसेसमध्ये आहे. अलिकडे तर घरातली चहाऐवजी आता कॉफीचं सेवन अधिक वाढलं आहे.
कॉफी पिण्याचं चलन जवळपास सर्वच ऑफिसेसमध्ये आहे. अलिकडे तर घरातली चहाऐवजी आता कॉफीचं सेवन अधिक वाढलं आहे. त्यामुळे कॉफीच्या फायद्यांवर आणि तोट्यांवर नेहमीच चर्चा होत असते. वेगवेगळ्या रिसर्चमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात.
नुकत्यात एका रिसर्चमधून समोर आले आहे की, भारतात पुरूषांना होणाऱ्या कर्करोगामध्ये सर्वात जास्त प्रकरणं आढळतात की, प्रोस्टेट कॅन्सरची. प्रोस्टेट कॅन्सरबाबत पुरूषांना धोका अधिक असतो कारण ते या कॅन्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण कॉफीमध्ये आढळणारे खास तत्व हा कॅन्सर होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या तत्वांना रोखण्याचं काम करतात.
कॉफीवर झालेल्या या शोधातून कनाजावा विश्वविद्यालयाच्या संशोधकांना आढळले की, कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल नावाचे तत्व जे कॉफीमध्ये आढळतात ते प्रोस्टेट कॅन्सर वाढण्यासपासून रोखतात.
कॉफीमध्ये आढळणारे तत्व कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टॉल नावाचे तत्व एकप्रकारे हायड्रोकार्बन आहेत. हे दोन्ही तत्व जे प्रोस्टेट कॅन्सरला रोखण्यास मदत करतात ते कॉफीमध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळतात. शोधात ज्या कॉफीचा समावेश करण्यात आला होता, त्या कॉफीला अरेबिका कॉफी नावाने ओळखले जाते.
या शोधातून समोर आले आहे की, कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल पेशींची वाढ रोखू शकतात. शोधाचे प्रमुख लेखक हिरोकी इवामोटो म्हणाले की, 'आम्हाला आढळलं की, कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल तत्वांचा प्रयोग उंदरांवर केला गेला. या तत्वांमुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखली. पण यांचं एकत्र असणं जास्त प्रभावी ठरतं.
हा शोध करणाऱ्या टीमने कॉफीमध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळणाऱ्या सहा तत्वांचं परीक्षण केलं. हा शोध बार्सिलोना इथे झालेल्या यूरोपियन असोसिएशन ऑफ यूरोलॉजी कॉंग्रेसमध्ये सादर करण्यात आला. या शोधानुसार, मनुष्याच्या प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींवर प्रयोगशाळेत परीक्षण करण्यात आलं.