कोल्ड ड्रिंक्स पिणं विषाइतकचं ठरू शकतं जीवघेणं, किडनीसह 'हे' अवयव होतील डॅमेज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 10:21 AM2020-04-09T10:21:21+5:302020-04-09T10:21:43+5:30
गरमीच्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सची मागणी वाढलेली असते. त्यामुळे शरीराला तात्पुरतं बरं वाटत असेल तरी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडत असतो.
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे सर्वाधिक लोक कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करतात. घामामुळे शरीरात उष्णता वाढत असल्यामुळे थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. अनेकदा ही सवय जीवघेणी सुद्धा ठरू शकते. अनेकांना सोडा प्यायची खूप जास्त इच्छा असते. त्याचे सुद्धा वेगवेगळे फ्लेवरर्स असतात. गरमीच्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सची मागणी वाढते. त्यामुळे शरीराला तात्पुरतं बरं वाटत असेल तरी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडत असतो.
सोडा कार्बोनेटेड वॉटर, साखर, फ्रक्टोज इत्यादी केमिक्लसचं मिश्रण असतं. या व्यतिरिक्त त्यात फॉस्फोरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. युरिनवर परिणाम होऊन किडनी स्टोनची समस्या उद्भवते. त्यात ३३ टक्के किडनी स्टोन होण्याची क्षमता असते. जास्त थंड पेयांचे सेवन केल्याने किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. त्यामुळे क्रोनिक किडनी डिजीज होण्याची शक्यता जास्त असते.
एका रिसर्चनुसार महिलांच्या आरोग्यावर अशा पेयांच्या सेवनाचा अधिक परिणाम होतो. यात कुत्रिम फ्लेवरर्स वापरले जातात. त्यामुळे किडनीचं कार्य खराब होऊ शकतं. अनेक पेयांमध्ये साखरेचा वापर हमखास केलेला असतो. त्यामुळे अशा पेयांच्या सेवनाने पचनशक्ती खराब होते, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखं वाटणं अशा समस्या उद्भवतात. इचकंच नाही तर त्यामुळे वजन वाढण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करणं टाळल्यास उत्तम ठरेल. ( हे पण वाचा-Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान असं राहा मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट)
सोडा, कोल्ड ड्रिंक्स यात कुत्रिम फ्लेवर्स असातत. जे शरीरासाठी घातक असतात. त्यासाठी अशा पेयांचे सेवन करणं शरीरासाठी योग्य नाही. लिंबू किंवा लाईम फ्लेवरमध्ये काही प्रमाणात फॉस्फरस कमी असतं. त्यामुळे याचं सेवन करणं जीवघेणं ठरू शकत नाही. काही पेयांमध्ये पोटॅशियम जास्त असतं. त्यामुळे किडनीशी जोडलेल्या आजारांपासून लांब राहण्यासाठी या पेयांचं सेवन कमी करा. ( हे पण वाचा- Coronavirus: धक्कादायक खुलासा; कोरोनाच्या धास्तीने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषध घेत असाल तर...)