थंडीत वाढतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, हृदयरोगतज्ज्ञांची माहिती; हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 06:12 AM2023-11-30T06:12:23+5:302023-11-30T06:12:51+5:30

Health News: हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे.

Cold increases risk of heart attack and stroke, says cardiologist; 20 to 30 percent increase in heart disease | थंडीत वाढतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, हृदयरोगतज्ज्ञांची माहिती; हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

थंडीत वाढतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, हृदयरोगतज्ज्ञांची माहिती; हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली - हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते,  थंड हवामानात उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. अति थंडीत हृदयविकाराचा त्रास, ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांगवायूचा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळा जसजसा वाढत जातो तसतशी रुग्णालयांमध्ये हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे.

दुर्लक्ष पडेल महागात
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मधुमेही रुग्णांना पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. 
त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवा. वेदना, जडपणा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.

असा वाढतो धोका...
- थंडीमुळे हिवाळ्यात धमन्या आकसतात. रक्तवाहिन्यांना रक्त पाठवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.
- ऑक्सिजनची कमतरता
- गुठळ्या होण्याचा धोका
- हृदयातील रक्तप्रवाह वाढतो. हिवाळ्यात तळलेले पदार्थ जास्त खाणे
- मद्यपान आणि धूम्रपान यांचा अतिरेक
- तणाव आणि नैराश्य
-  व्यायाम न करणे

- २८.१% मृत्यू हे भारतात २०१६ मध्ये हृदयविकाराने झाले, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती.
- १५.२% मृत्यू १९९० मध्ये हृदयविकाराने होत होते.
- ११ कोटी पुरुष, ८ लाख महिलांना जगभरात हृदयरोग आहे.
- ९० लाख लोकांचा हृदयरोगामुळे दरवर्षी मृत्यू होतो.
- २०१९ मध्ये सर्वाधिक मृत्यू हे  हृदयरोगामुळे झाले. 
- ६-१ मृत्यू जगभरात हृदयरोगामुळे होतो

Web Title: Cold increases risk of heart attack and stroke, says cardiologist; 20 to 30 percent increase in heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.