थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर कडाक्याच्या उष्णतेनेही होते सर्दी; 'या' आजारांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:19 PM2024-07-31T12:19:35+5:302024-07-31T12:20:49+5:30

पावसाळा संपल्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे सर्दी होते.

Cold is caused not only by wind, but also by extreme heat | थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर कडाक्याच्या उष्णतेनेही होते सर्दी; 'या' आजारांना निमंत्रण

थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर कडाक्याच्या उष्णतेनेही होते सर्दी; 'या' आजारांना निमंत्रण

पावसामुळे किंवा थंडी-वाऱ्यामुळे अनेकांना सर्दी होते. काहींना तर पाण्यात बदल झाला, तरी सर्दी होते. काहींना ॲलर्जी सर्दी असते. तथापि, सर्दीचा आणखी एक प्रकार म्हणजे उष्णतेने होणारी सर्दी, कडाक्याच्या उन्हातून फिरलात, उष्मा जाणवायला लागला तरी सर्दी होते.

विशेषतः पावसाळा संपल्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे सर्दी होते. या सर्दीला ॲन्टिबायोटिक घेण्यापेक्षा घरगुती, आयुर्वेदिक उपचार घेतलेले अधिक पित्त व सर्दी यांचा तसा काही संबंध नाही. अतिचहा, कॉफी, जागरण, अवेळी जेवण, उपवास यामुळे पित्त होते, तर वातावरणातील बदलामुळे सर्दी होते.

याचं करा सेवन

तुळस - तुळस या वनस्पतीत आटव्हायरलचे गुणधर्म असतात. आपण तुळशीचा चहामध्ये वापर करून तो पिऊ शकता. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

उसाचा रस - उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. हा रस घेतल्यामुळे  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. उसाचा रस पिल्यामुळे आणि इतर संक्रमणे बरे होण्यास मदत होते.

सर्दी अनेक कारणांनी होत असली तरी प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे सर्दीचा त्रास होतो. त्यामुळे कोरोना काळात जे उपचार घेतले तसे उपचार घेतले पाहिजेत. सकाळी, संध्याकाळ वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय?

तापमानात अचानक बदल झाल्यास शरीरावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात अचानक आल्यास तीव्र सर्दीचा त्रास होणे स्वाभाविक असते.

परस्पर विरोधी वातावरणाचा आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन एकदम थंड किंवा उष्ण वातावरणात गेल्यास हा त्रास उद्भवतो. या कालावधीत आहाराबाबतही विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.

सर्दी कशामुळे होऊ शकते?

१) पावसात भिजल्याने: पाऊस सर्वांना आवडत असला तरी जास्त वेळ पावसात भिजल्याने  सर्दी होऊ शकते.

२) धूलिकण: रस्त्यावर फिरत असताना वातावरणातील धूलिकणांमुळे तसेच प्रदूषणामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.

३) धुपकांडी: घरात धुपकांडी लावली असेल किंवा डासांचा उपद्रव टाळण्यासाठी लिक्विडयुक्त धूप लावल्यास श्वसनात त्रास होऊ शकतो.

४) ओल्या भिंतीच्या संपर्कात जास्त आल्यास: बऱ्याच वेळा पावसाळ्यात घराच्या भिंती ओल्या होतात, अशा ओल्या भिंतीच्या खोलीत वास्तव्य केल्याने सर्दी होते.
 

Web Title: Cold is caused not only by wind, but also by extreme heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.