फ्रिजमधील थंड पाणी पिताय? मग सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 01:25 PM2017-05-09T13:25:10+5:302017-05-09T18:55:10+5:30

फ्रिजमधील पाण्याचे किंवा बर्फाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणे किंवा बर्फ खाणे खुप आवडते. तुम्हाला जर बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी.

Cold water in the fridge? Then be careful! | फ्रिजमधील थंड पाणी पिताय? मग सावधान!

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? मग सावधान!

googlenewsNext
्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाच्या झळ्यांमुळे अक्षरश: काहिली होत आहे. आॅफिस, शाळा, कॉलेजमधून घरी आलो की, तहान लागल्याने आपण पहिल्यांदा फ्रिज उघडतो अन् काही क्षणांतच पाण्याची संपूर्ण बॉटल रिकामी करतो. मात्र, तुम्हाला माहितीये का, फ्रिजमधील पाण्याचे किंवा बर्फाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणे किंवा बर्फ खाणे खुप आवडते. तुम्हाला जर बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी. अन्यथा, शरीरांत होणाऱ्या  दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला फ्रिजमधील थंड पाणी न पिण्यामागची कारणे, दुष्परिणाम काय आहेत ते सांगणार आहोत.

थंडपाणी न पिण्यामागची कारणे-

* पचनशक्तीच्या कार्यात अडथळा 
तुमचे शरीर ठणठणीत राहायला हवे असेल तर तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निरोगी शरीरयष्टीसाठी पचनक्रिया व्यवस्थित होणे अपेक्षित असते. मात्र, थंड पाण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आंकुचित होतात. ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. पचनक्रियेवर परिणाम झाल्याने तुमच्या शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे अन्नातील पोषकमुल्ये शरीराला मिळू शकत नाही. यासाठी कोमट पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

* पोषणमुल्यावर होतो परिणाम 
शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा तुम्ही कमी तापमान असलेले पेय पिता तेव्हा तुमच्या शरीराला बदललेले तापमान संतुलित करण्यासाठी उर्जा खर्च करावी लागते.अन्नाचे पचन करणे,पोषणमुल्ये शोषून घेणे यासाठी वापरण्यात येणारी उर्जा तापमान संतुलित करण्यासाठी वापरल्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.



* घश्यांत इन्फेक्शनचे प्रमाण वाढते
जेव्हा तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो. या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो. ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढू शकते. 



* हार्ट रेट कमी होण्याची शक्यता
थंड अथवा बर्फाचे पाणी पिण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढू लागतात. संशोधनानूसार, यामुळे तुमची एक वेगस नावाची नस उत्तेजित होते. ही १० वी क्रॅनिअल नर्व्ह असल्याने ती शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवणाºया स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्वाचा भाग असते.  ही नर्व्ह हृदयाचे ठोके कमी करण्यासाठी कारणीभूत असते. 

Web Title: Cold water in the fridge? Then be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.