शरीरात कोलेजन झालं कमी तर दिसू लागाल म्हातारे, लगेच खाणं सुरू करा या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 02:40 PM2023-08-19T14:40:40+5:302023-08-19T14:41:19+5:30

Health Tips : कोलेजन शरीरात वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतं. शरीरात याची कमतरता झाली तर हाडे कमजोर होतात. याची कमतरता झाल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव त्वचेवर पडतो.

Collagen is essential for body include these collagen producing foods to your diet for healthy skin | शरीरात कोलेजन झालं कमी तर दिसू लागाल म्हातारे, लगेच खाणं सुरू करा या गोष्टी

शरीरात कोलेजन झालं कमी तर दिसू लागाल म्हातारे, लगेच खाणं सुरू करा या गोष्टी

googlenewsNext

Health Tips : कोलेजन शरीरात आढळणारं एक प्रोटीन आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन फार महत्वाचं असतं. हे शरीरातील बऱ्याच गोष्टी जसे की, टेंडन्स, फॅट, जॉइन्ट्स आणि लिगामेंट्समध्ये आढळतं. कोलेजन हाडांना मजबूत करतं, त्वचेला सुंदर करतं, केस मुलायम करतं, मांसपेशींना मजबूत करण्याचं काम करतं.

कोलेजन शरीरात वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतं. शरीरात याची कमतरता झाली तर हाडे कमजोर होतात. याची कमतरता झाल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव त्वचेवर पडतो. यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या वाढते. 

तुम्ही काही खाद्य पदार्थांसोबतच काही सप्लीमेंट्सच्या माध्यमातून कोलेजन मिळवू शकता. कोलेजन सप्लीमेंट्स आणि नॅच्युरल रिसोर्सवर सतत रिसर्च केला जात आहे. पण हे तर स्पष्टच आहे की, कोलेजन तुमच्या आहाराचा महत्वाचा भाग असला पाहिजे.

कोलेजन गरजेचं का?

वाढत्या वयासोबत शरीरात कोलेजनची लेव्हल कायम ठेवणं अवघड होत असतं. खासकरून मेनोपॉजमधून गेलेल्या महिलांना याची कमतरता सगळ्यात जास्त जाणवते. असं होतं कारण की, काळानुसार शरीराला आवश्यक पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यात समस्या येऊ लागते. जे कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. पण कोलेजन असलेले पदार्थ खाऊन ही समस्या दूर करता येते. 

कोलेजनयुक्त पदार्थ

कोलेजन सगळ्यात जास्त मांसामध्ये भरपूर असतं. पण असेही काही प्लांट बेस्ड प्रोडक्ट असतात ज्यात कोलेजन भरपूर असतं.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत असतं. पालक, मेथी, ब्रोकलीसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. अनेक स्टडीमधून समोर आले आहे की, या भाज्या खाल्ल्याने त्वचेत कोलेजनचं प्रमाण वाढतं.

आंबट फळं

संत्री, द्राक्ष्य आणि लिंबूसारख्या आंबट फळातून व्हिटॅमिन सी भरपूर मिळतं. यातील तत्व शरीरात कोलेजन वाढवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजन अधिक चांगल्या पद्धतीने अब्सॉर्ब करण्यास मदत करतात.

Web Title: Collagen is essential for body include these collagen producing foods to your diet for healthy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.