लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 09:48 AM2019-09-05T09:48:00+5:302019-09-05T09:56:37+5:30

अनेकदा कॅन्सरचं निदान उशीरा होत असल्याने आणि वेळीच उपचार घेता येत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

Color-Changing Urine Test Could Help Detect Cancer | लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान!

लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान!

googlenewsNext

अनेकदा कॅन्सरचं म्हणजेच कर्करोगाचं निदान उशीरा होत असल्याने आणि वेळीच उपचार घेता येत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सध्या आहेत. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट येण्यास बराच उशीर लागतो. अशात आता आणखी एका टेस्टची यात भर पडली आहे. यूरिन टेस्टच्या माध्यमातून आता कॅन्सर झाला आहे की नाही याची माहिती मिळवता येणार आहे. 

(Image Credit : thesun.ie)

मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी यूरिनच्या रंगावरून कॅन्सरची माहिती मिळवण्याचा प्रयोग केला. याचा प्रयोग उंदरावर करण्यात आला. वैज्ञानिकांनुसार, टेस्ट दरम्यान यूरिनचा रंग निळा होत असेल तर हा कोलोन कॅन्सर असल्याचं स्पष्ट होतं. असाही दावा केला जातोय की, टेस्टची ही पद्धत फारच स्वस्त आहे, जी सामान्य लोक सहज करू शकतील.

एका तासात मिळणार रिपोर्ट

(Image Credit : hitconsultant.net)

हा रिसर्च मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजने एकत्र मिळून केला. वैज्ञानिकांनुसार, यूरिन टेस्टच्या माध्यमातून सुरूवातीच्या काळातच कॅन्सरची माहिती मिळवली जाऊ शकते. नेचर नॅनोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, या टेस्टसाठी लॅबमध्ये फार साधन सामुग्रींची देखील गरज पडणार नाही. त्यामुळेच टेस्टची ही पद्धत फार सोपी आहे. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

प्राध्यापक मॉली म्हणाले की, टेस्ट दरम्यान यूरिनमध्ये रसायनांच्या क्रिया-प्रतिक्रियेने याच रंग बदलतो. ज्याद्वारे कॅन्सरची माहिती मिळते. हा रिसर्च २८ उंदरांवर करण्यात आला, यातील १४ उंदरं हे कोलोन कॅन्सरने पीडित होते आणि १४ सामान्य होत. सॅम्पल घेतल्यावर अर्ध्या तासाच्या आतच टेस्ट शक्य झाली. वैज्ञानिकांनी याला कलरिमेट्रिक यूरिनरी एसे असं नाव दिलं आहे.

वैज्ञानिकांनुसार, या टेस्टच्या मदतीने अनेक प्रकारचे कॅन्सर आणि इतरही दुसऱ्या आजारांची माहिती मिळवता येऊ शकते. टेस्ट अजून सुरूवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि आणखी चांगली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कॅन्सरच्या टेस्टसाठी एमआरआय स्कॅन, ब्लड टेस्ट केलं जातं. पण या टेस्टचा रिपोर्ट येण्यास वेळ लागतो. तेच यूरिन टेस्टचा रिपोर्ट केवळ एका तासात मिळतो.

Web Title: Color-Changing Urine Test Could Help Detect Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.