आतड्या ब्लॉक करतो कोलोरेक्टल कॅन्सर, केवळ टॉयलेटमध्ये दिसतात हे 6 संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:10 AM2023-03-11T10:10:30+5:302023-03-11T10:10:45+5:30

Colorectal Cancer Signs: दोन अवयवांना प्रभावित करणाऱ्या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर म्हटलं जातं. ज्याचा अर्थ हा आहे की, तुमच्या मोठ्या आतडीमध्ये किंवा मलाशयात कॅन्सर होत आहे.

Colorectal cancer may block intestine and 6 signs that can see in bowel movements | आतड्या ब्लॉक करतो कोलोरेक्टल कॅन्सर, केवळ टॉयलेटमध्ये दिसतात हे 6 संकेत

आतड्या ब्लॉक करतो कोलोरेक्टल कॅन्सर, केवळ टॉयलेटमध्ये दिसतात हे 6 संकेत

googlenewsNext

Colorectal Cancer Signs: कॅन्सर हा सायलेंट आजार मानला जातो. जो आतल्या आत घातक बनत जातो. कोलोरेक्टल कॅन्सरही असाच कॅन्सर आहे. ज्याचे सुरूवातीची लक्षण दिसण्याची शक्यता कमी असते. पण केवळ टॉयलेटमध्ये दिसणाऱ्या या 6 बदलांकडे लक्ष देऊन याची माहिती मिळवता येते.

दोन अवयवांना प्रभावित करणाऱ्या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर म्हटलं जातं. ज्याचा अर्थ हा आहे की, तुमच्या मोठ्या आतडीमध्ये किंवा मलाशयात कॅन्सर होत आहे. दरवर्षी मार्चमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून पाळला जातो. 

टॉयलेट करताना वेदना

डॉक्टरांनुसार, हे सगळ्यात सामान्य लक्षण आहे. ज्याला पोटाची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही रूग्णांच्या पोटात वेदना किंवा क्रॅम्पही येऊ शकतो. ज्याचं कारण मोठ्या आतडीमध्ये ब्लॉकेज होणं आणि विष्ठेला बाहेर निघण्यास मार्ग न मिळणं आहे.

मलत्याग करताना रक्त येणं

कोलेरेक्टर कॅन्सरचं हे लक्षणही बद्धकोष्ठता किंवा पाइल्सचा संकेत समजलं जातं. पण कॅन्सरमध्ये सतत ब्लीडिंग होत राहते आणि ही स्थिती आणखी गंभीर होत जाते. बद्धकोष्ठतेत ब्लीडिंग सतत होत नाही.

डायरियाची समस्या

डॉक्टरांनुसार, अनेकदा या कॅन्सरमुळे टॉयलेट जावं लागण्याची सवय आणि विष्ठेच्या स्वरूपात फरक पडतो. कारण आतड्यामधील ट्यूमरमधून पससारखा तरल पदार्थ निघतो. जो डायरियासारखा रिझल्ट देऊ शकतो. अनेकदा डायरियाची ही समस्या फार गंभीर होऊ शकते.

बद्धकोष्ठता आणि पातळ विष्ठा

कोलोरेक्टल कॅन्सरच्या सुरूवातील बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. कारण ट्यूमरमुळे आतडी ब्लॉक होते आणि विष्ठा बाहेर येऊ शकत नाही. त्याशिवाय या ब्लॉकेजमुळे पातळ विष्ठाही येऊ शकते. 

पोट साफ होऊनही अस्वस्थता

जेव्हा ट्यूमर आतडीला ब्लॉक करतं तेव्हा पोट साफ होऊनही असं वाटतं की, पोट पूर्णपणे साफ झालं नाही. यामुळे एक अस्वस्थता जाणवत राहते.

Web Title: Colorectal cancer may block intestine and 6 signs that can see in bowel movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.