कलर्ड टॅटू शरीरासाठी जास्त घातक, रिसर्चमधून धक्कादायक गोष्ट उघड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:01 AM2019-09-16T10:01:04+5:302019-09-16T10:10:03+5:30

आजकाल तरूणाईमध्ये टॅटूची फारच क्रेझ बघायला मिळते. तरूण मंडळी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू काढतात.

Colored tattoo is dangerous for body attacks lymph nodes reveals a study | कलर्ड टॅटू शरीरासाठी जास्त घातक, रिसर्चमधून धक्कादायक गोष्ट उघड!

कलर्ड टॅटू शरीरासाठी जास्त घातक, रिसर्चमधून धक्कादायक गोष्ट उघड!

googlenewsNext

(Image Credit : businessinsider.in)

आजकाल तरूणाईमध्ये टॅटूची फारच क्रेझ बघायला मिळते. तरूण मंडळी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू काढतात. ही ट्रेन्डच झाला आहे. पूर्वी केवळ एका रंगात टॅटू काढला जात होता. पण आता कलर्ड टॅटूचीही क्रेझ वाढली आहे. पण फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये युरोपियन सिंक्रोट्रॉन रेडिएशन फॅसिलिटीच्या वैज्ञानिकांना टॅटू काढून घेणाऱ्या लोकांच्या  लिम्फ नोडमध्ये (इम्यून सिस्टीमचा एक भाग) क्रोमियम मेटल्स आढळले. या रिसर्चमधून हे समोर आलं की, हा धातु शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकतो.

(Image Credit : www.npr.org)

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, कलर्ड टॅटू तुमच्या लिम्फ नोड्समध्ये जड केमिकल्स रिलीज करू शकतात आणि शरीरात शाईमुळे अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. या रिसर्चनंतर हे सिद्ध झालं की, टॅटू काढण्यात येणाऱ्या सुईने छोटे छोटे मेटलचे कण तुमच्या स्कीनमध्ये प्रवेश करतात आणि लिम्फ नोड्समध्ये फिरू लागतात. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅलर्जी होऊ शकतात. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकारच्या अ‍ॅलर्जीवरील उपचारही सोपे नसतात.

लिम्फ नोडमध्ये आढळलं केमिकल

लिम्फ नोड हा इम्यून सिस्टीमचा एक भाग आहे, ज्यात मेटल्सचे छोटे छोटे कण आढळले. हा रिसर्च ८५० लोकांवर करण्यात आला. फ्रान्सच्या ग्रेनोबल युरोपियन सिंक्रोट्रॉन रेडिएशन फॅसिलिटीच्या वैज्ञानिकांना टॅटू काढून घेणाऱ्या लोकांच्या लिम्फ नोडमध्ये क्रोमियम धातु आढळला.  

(Image Credit : shoulditattoo.com)

टॅटू काढण्यासाठी कलरचा वापर केला जातो, ज्यात मेटल्स असतात. हे मेटल सुईच्या माध्यमातून शरीरात जाऊ लागलं. पांढऱ्या रंगांसाठीही शाईचा वापर केला जातो. ज्याला टायटेनियम डॉयऑक्साइड म्हटलं जातं आणि याला नेहमी निळ्या, हिरव्या आणि लाल यांसारख्या गर्द रंगांमध्ये मिश्रित केलं जातं. 

ईएसआपएफचे वैज्ञानिका इनेस श्राइवर यांच्यानुसार, टॅटूमध्ये वापरले जाणारे आयर्न,  क्रोमियम आणि शाईचे रंग यांच्यात संबंध शोधण्यसाठी आम्ही अनेक प्रयोग केले. त्यानंतर आम्हाला असं दिसलं की, सुईने छोटे छोटे धातुचे कण त्वचेत प्रवेश करतात आणि लिम्फ नोडमध्ये वाहू लागतात, ज्याने अ‍ॅलर्जी निर्माण होते.

Web Title: Colored tattoo is dangerous for body attacks lymph nodes reveals a study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.