काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काही नुकसान होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 11:20 AM2019-12-14T11:20:13+5:302019-12-14T11:23:28+5:30

खातांना ते चांगलंही वाटत असेल पण काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं याचा कधी विचार केलाय का?

Is the combination of tomatoes and cucumbers really unhealthy? | काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काही नुकसान होतं का?

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काही नुकसान होतं का?

googlenewsNext

(Image Credit : thehealthcaretoday.com)

अनेकदा सलादमध्ये काही लोक टोमॅटो आणि काकडी एकत्र खातात. खातांना ते चांगलंही वाटत असेल पण काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं याचा कधी विचार केलाय का? मुळात काकडी आणि टोमॅटोमध्ये इतके गुण असतात की, एकत्र खाल्ल्याने त्याचे आरोग्याला नुकसानही होऊ शकतात. 

(Image Credit : useyourbrainforscience.com)

काकडी आणि टोमॅटो दोन्हींमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण एकत्र खाल तर याने पोटासंबंधी वेगवेगळे आजारही होऊ शकतात. काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.

असं का होतं?

तज्ज्ञ सांगतात की, काकडी आणि टोमॅटो हे दोन्ही विरूद्ध आहार यादीत येतात. याचा अर्थ हा होतो की, हे काकडी आणि टोमॅटो एकमेकांच्या विरूद्ध आहेत. या दोन्हींचा पोटात पचन्याचा वेळही वेगवेगळा असतो. त्यामुळे पोटात एकत्र गेल्यावर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

काकडी आणि टोमॅटोचे गुण विरूद्ध आहेत. एक लवकर पचतं तर दुसरं हळूहळू. अशात दोन्ही एकत्र खाल्ल्याने समस्या तर होणारच ना. कारण एक आधी पचून इंटेस्टाइनमध्ये पोहोचतं आणि दुसऱ्याची पचनक्रिया सुरू राहते. याने शरीरात तणाव जाणवू लागतो. अशाप्रकारची समस्या पोटासोबतच संपूर्ण शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे टाळावे, नाही तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


Web Title: Is the combination of tomatoes and cucumbers really unhealthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.