सर्दीच्या व्हायरसने कॅन्सरवर उपचार शक्य; काय म्हणतो रिसर्च?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:49 AM2019-07-08T10:49:55+5:302019-07-08T10:53:48+5:30

सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल काही काय म्हणताय? पण या प्रश्नाचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Common cold virus could help cure bladder cancer completely say a study | सर्दीच्या व्हायरसने कॅन्सरवर उपचार शक्य; काय म्हणतो रिसर्च?

सर्दीच्या व्हायरसने कॅन्सरवर उपचार शक्य; काय म्हणतो रिसर्च?

Next

सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल काही काय म्हणताय? पण या प्रश्नाचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरचं सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य असल्याचे संशोधकांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे. म्हणजेच, कॉमन कोल्डचे व्हायरस कॅन्सरच्या पेशींना मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे. मेडिकल एक्सप्रेस या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांचे म्हणणे आहे की, कोल्ड व्हायरस म्हणजेच, coxsackievirus किंवा CVA21 ब्लॅडरमधील कॅन्सरच्या पेशी मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करतात. 

संशोधनाच्या ट्रायलसाठी इंग्लंडमधील यूनिवर्सिटी ऑफ सरी द्वारे करण्यात आलेल्या एका तपासणीमध्ये पित्ताशयाच्या कॅन्सरने (ब्लॅडर कॅन्सर) ग्रस्त असणाऱ्या 15 रूग्णांना सामाविष्ट करण्यात आलं होतं. सर्जरी करण्याच्या आधी या रूग्णांना coxsackievirus किंवा CVA21 नावाचं कोल्ड व्हायरस इंजेक्ट करण्यात आलं. सर्जरी केल्यानंतर जेव्हा रूग्णांच्या पेशींची तपासणी करण्यात आली, त्यावेळी कोल्ड व्हायरसने फक्त कॅन्सरच्या पेशीच नष्ट नाही केल्या तर प्रजननामार्फत या व्हायरसने आपली संख्या देखील वाढवल्याचे दिसून आले. 

वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, कोल्ड व्हायरस कॅन्सरच्या पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर एका प्रतिरोधात्मक प्रोटिनला जन्म देतात, ज्यामुळे इतर पेशींना संकेत मिळतो आणि त्यादेखील या व्हायरसशी जोडल्या जातात. तपासणीमध्ये सहभागी करण्यात आलेल्या सर्व रूग्णांमध्ये असं दिसून आलं की, त्यांच्यामध्ये ट्यूमर नष्ट होण्यासोबतच कॅन्सरच्या पेशीही मुळापासून नष्ट झाल्याचं दिसून आलं. एवढचं नाही तर काही आठवडे ट्रिटमेंट घेतल्यानंतर कॅन्सरची काही लक्षणं आणि संकेतही पूर्णपणे नष्ट झाले. 

आजकाल ब्लॅडर कॅन्सर म्हणजेच, पित्ताशयाच्या कॅन्सरही इतर कॅन्सरप्रमाणे साधारण झाला आहे. सुरुवातीला या कॅन्सरची लक्षणं समजणं कठिण असतं, कदाचित म्हणूनच या कॅन्सरला ब्रेस्ट कॅन्सरप्राणेच सायलेन्ट किलर म्हटलं जातं. जास्तीत जास्त रूग्णांना या आजाराची लक्षणं वाढल्यानंतर समजतात. 2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असलेले सर्वात जास्त रूग्ण उत्तर भारतामध्ये आढळून आले होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Common cold virus could help cure bladder cancer completely say a study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.