उन्हाळ्यात व्हायरल आणि डायरियाने हैराण आहात का?; अशी घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:48 PM2019-04-23T12:48:47+5:302019-04-23T12:49:23+5:30

वातावरणामधील उकाडा प्रचंड वाढला असून बदलणाऱ्या वातावरणामुळे व्हायरल फिवर आणि इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.

Common summer diseases and how to stay protected | उन्हाळ्यात व्हायरल आणि डायरियाने हैराण आहात का?; अशी घ्या काळजी 

उन्हाळ्यात व्हायरल आणि डायरियाने हैराण आहात का?; अशी घ्या काळजी 

Next

वातावरणामधील उकाडा प्रचंड वाढला असून बदलणाऱ्या वातावरणामुळे व्हायरल फिवर आणि इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. सर्दी, हात आणि पायांना सूज येणं आणि प्रचंड डोकेदुखीचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर घसा आणि कान दुखणं यांसारख्या व्हायरल समस्यांचाही सामना करावा लागतो. 

असा करा बचाव 

व्हायरल समस्यांपासून बचाव करण्यासाठी घर स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. घरामध्ये एकाच ठिकाणी पाणी साठू देऊ नका. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणं शक्यतो टाळाच. पाणी उकळून प्या. 

डायरियाची लक्षणं

पोटाच्या खालच्या भागामध्ये वेदना होणं, उलट्या येणं, ताप येणं आणि शरीरावा थकवा जाणवणं. जर अधिक त्रास होत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

असा करा बचाव 

एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे साखर आणि थोडसं मीठ, लिंबाचा रस एकत्र करून प्या. तसेच अशावेळी नारळाचं पाणी पिणंही फायदेशीर ठरतं. डायरिया झाला असल्यास मुलांना डाळीचं पाणी, तांदळाची पेज आणि दही-भात खाण्यासाठी देऊ शकता. पाण्यामध्ये बडीशोपेचे पूड एकत्र करून पिण्यासाठी दिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. अशावेळी शक्यतो मसालेदार पदार्थ खाण्यासाठी देऊ नये. 

सन स्ट्रोकची लक्षणं 

जास्त वेळ उन्हामध्ये राहिल्याने शरीराचं तापमान अचानक वाढतं. यालाच सन स्ट्रोक असं म्हणतात. याला हापरथर्मिया असंदेखील म्हणतात. याच्या लक्षणांबाबत सांगायचे झाले तर, डोकेदुखी, उलट्या येणं, चक्कर येणं, स्नायूंना वेदना जाणवणं, ताप येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

असा करा बचाव 

जास्तीत जास्त पेय पदार्थांचे सेवन करा, जास्त उन्हामध्ये घराबाहेर पडू नका, हलक्या रंगाचे लूज फिटिंग असलेले कपडे वेअर करा, उन्हामध्ये पार्क केलेल्या कारमध्ये जास्त वेळ बसू नका. 

डोळ्यांना इन्फेक्शन 

उन्हाळ्यामध्ये डोळे लाल होण्याची समस्या अत्यंत साधारण आहे. हे डोळ्यांमध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारं इन्फेक्शन किंवा एखाद्या गोष्टीमुळे होणारी अॅलर्जी असते. ज्यामुळे डोळ्यांमध्ये खाज येणं आणि जळजळ होऊ लागते आणि डोळे लाल होतात. ही परिस्थिती 4 ते 7 दिवसांपर्यंत राहते. ह व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हे होण्याची शक्यता जास्त असते. 

असा करा बचाव 

आपल्या हातांना व्यवस्थित धुवून स्वच्छ करा आणि डोळ्यांना सतत हात लावू नका. डोळ्यांमधून सतत पाणी येत असेल तर ते पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल आणि रूमालाचा वापर करा. आपल्या टॉवेल किंवा रूमाल एकमेकांशी शेअर करू नका. त्याचबरोबर डोळ्यांसाठी वापरण्यात येणारे कॉस्मेटिक्स एकमेकांसोबत शेयर करू नका. 

डिहायड्रेशनची लक्षणं 

उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना सर्वांना करावा लागतो. कारण उन्हाळ्यामध्ये घाम जास्त आल्याने शरीराला पाण्याची जास्त गरज भासते. जर पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहाड्रेशनची समस्या जास्त होऊ शकते. लक्षणांबाबत बोलायचे झाले तर लघवी करताना जळजळ होणं, चक्कर येणं, हृदयाची धडधड वाढणं, अनिद्रा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

असा करा बचाव 

जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्या. पाणी प्या, फ्रुट ज्यूस, दूध यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. परंतु हाय-प्रोटीन एनर्जी ड्रिंक आणि अल्कोहोलिक ड्रिंक्सपासून लांब रहा. आपल्या डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

 

Web Title: Common summer diseases and how to stay protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.