ल्यूकेमियाची कॉमन लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:37 PM2023-10-05T15:37:09+5:302023-10-05T15:37:50+5:30
leukemia symptoms : जर योग्य वेळेवर ल्यूकेमियाच्या लक्षणांची माहिती मिळाली नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
leukemia symptoms : ल्यूकेमिया हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण अनेकांचा हा आजार नेमका काय आहे हे माहीत नसतं. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात. जर योग्य वेळेवर ल्यूकेमियाच्या लक्षणांची माहिती मिळाली नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
तसेच ल्यूकेमिया कोणत्या प्रकारचा आहे, हे कॅन्सरचं रूप घेणाऱ्या रक्तपेशींच्या प्रकारावर अवलंबून असतं. या आजाराची काही लक्षणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वेळीच सावध होऊ शकता.
सतत थकवा
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा झोप पूर्ण झाल्यावरही तुमच्या शरीरात जीव नसल्यासारखं जाणवत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. अशात याकडे जराही दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थकवा आणि कमजोरी तेव्हाच जाणवते जेव्हा तुमच्या शरीरात रक्त कमी होतं. रक्ताची कमतरता होण्याला अॅनीमिया असंही म्हटलं जातं.
आपोआप जखम होणे
कोणतीही फिजिकल इंजरी न होता जखम होणे किंवा शरीराच्या एखाद्या भागावर काळे किंवा निळे डाग पडले असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यासोबतच जखम भरण्यास अधिक वेळ लागत असेल तर हे ल्यकेमियाचं लक्षण असू शकतं.
डोकेदुखी
जर सतत डोकेदुखी होत असेल हे न्यूकेमियाचं लक्षण असू शकतं. तसेच डोक्यात होणाऱ्या ब्लीडिंगकडेही इशारा करतं.
रात्री अचानक घाम येणे
जर रात्री झोपताना तुम्हाला अचानक घाम येत असेल तर याबाबत डॉक्टरांशी बोला. अशाप्रकारे अचानक घाम येणे सामान्य बाब नाही. सामान्यपणे हे अशा काही इंन्फेक्शनमुळे होतं, ज्यांचा थेट संबंध ल्यूकेमियाशी असतो.
हिरड्यांमध्ये सूज
हिरड्यांमध्ये सूज ही नेहमीच तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने होते. तसेच हे ल्यूकेमियाचं लक्षण सुद्धा आहे. सतत हिरड्यांमध्ये सूज होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ताप
हा आजार झाल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होऊ लागते. त्यामुळे ताप येणे, सर्दी-खोकला होणे या समस्या होत राहतात.
श्वास घेण्यास त्रास
अधिक थकवा आणि कमजोरीमुळे शरीरावर आध्यात्मिक प्रेशर पडतं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. आणि व्यक्ती लवकर लवकर श्वास घेऊ लागतो. थोड्या पायऱ्या चढल्यातरी दम लागतो.
ब्लोटिंग
जर स्पलीनची साइज वाढली तर हे क्रॉनिक किंवा एक्यूट ल्यूकेमियाचं लक्षण असू शकतं. स्पलीनची साइज वाढल्याने भूक सुद्धा कमी लागते.