टॉयलेटमध्ये तासंतास जोर लावूनही पोट होत नाही साफ? लगेच करा 'हे' आयुर्वेदिक उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:47 AM2024-11-26T11:47:52+5:302024-11-26T11:49:10+5:30
Constipation home remedies : एक मोठी समस्या म्हणजे सकाळी पोट साफ न होणे. म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या होणे. बरेच लोक तासंतास टॉयलेटमध्ये जोर लावत बसतात, पण तरीही त्यांचं पोट साफ होत नाही.
Constipation home remedies : आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीची सवयी, चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणे यामुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. लोकांना पोटासंबंधी अनेक समस्या होतात. त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे सकाळी पोट साफ न होणे. म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या होणे. बरेच लोक तासंतास टॉयलेटमध्ये जोर लावत बसतात, पण तरीही त्यांचं पोट साफ होत नाही. अशात दिवसभर अस्वस्थता जाणवते आणि कशा मनही लागत नाही. ही समस्या काही घरगुती उपायांनी दूर केली जाऊ शकते.
पोट साफ न होण्याची कारणं
एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहत नाहीत. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्ही समोर असता किंवा फोन बघत असता. अशात फिजिकल अॅक्टिविटी जास्त होत नाही. याचा प्रभाव थेट पोटावर पडतो. तुम्ही जे खाता, पिता किंवा विचार करता त्याचा पोटावर प्रभाव पडतो. तुम्ही जर रात्री उशीरा खाता किंवा जास्त कार्ब्स खाता, ब्लू लाईटच्या संपर्कात जास्त राहता, तसेच तुम्ही फार जास्त तणावात राहत असाल, जास्त धुम्रपान करत असाल, रात्री उशीरा झोपत असाल तर या गोष्टींचा पोटावर नकारात्मक प्रभाव पडतो. हे लक्षात ठेवा की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात.
पोट साफ करणारा खास चहा
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये असे अनेक गुण असतात जे शरीराला डिटॉक्स करतात आणि पोट साफ करण्यासही मदत करतात. ग्रीन टी लॅक्सेटिवसारखं काम करत नाही. पण याच्या सेवनाने शरीराला अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण मिळतात, जे पचनक्रिया सुरळीत करतात. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
तुळशीच्या पानांचा चहा
तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. सामान्यपणे तुळशीचं सेवन सर्दी-पडसा कमी करण्यासाठी केलं जातं. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा चहा पिऊ शकता. यासाठी तुळशीच्या पानांना एक कप पाण्यात टाकून उकडा. त्यात लिंबाचा रस टाका आणि सेवन करा.
पदीन्याचा चहा
पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यासाठी पदीन्याच्या पानांचा चहा प्रभावी उपाय ठरू शकतो. या पानांमधील लॅक्सेटिव गुण पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतात. पाण्यात पदीन्याची काही पाने आणि आल्याचा एक तुकडा टाकून उकडा. याचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
कढीपत्त्याचा चहा
पोट साफ होण्यासाठी कढीपत्त्याचा चहा देखील फायदेशीर ठरू शकतो. या पानांमध्ये आयर्न आणि कॅल्शिअम भरपूर असतं. तसेच या पानांमुळे पचन तंत्र मजबूत राहतं. यासाठी काही पाने वाळवून आणि बारीक करून पाण्यात टाकून सेवन करा. याने तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळेल.