वजन कमी करायचंय?, या 3 डिटॉक्स ड्रिंक्सचे करा सेवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:11 PM2018-10-03T14:11:00+5:302018-10-03T14:12:37+5:30
लठ्ठपणा, वाढणारे वजन, पोटाचा सुटणार घेर आटोक्यात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फसत असल्यानं हैराण झाले आहात. काळजी करू नका, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामामुळे तुमची ही समस्या नक्कीच सुटेल.
लठ्ठपणा, वाढणारे वजन, पोटाचा सुटणार घेर आटोक्यात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फसत असल्यानं हैराण झाले आहात. काळजी करू नका, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामामुळे तुमची ही समस्या नक्कीच सुटेल. वजन घटवण्यासाठी व्यायाम करणं जेवढे महत्त्वाचे आहे, तितकेच पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवन करणंही आवश्यक आहे. यासोबत डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्यानंही वजन घटण्यास बरीच मदत मिळते. संतुलित आहाराच्या सेवनानंतर त्याच्या पचनप्रक्रियेत हे ड्रिंक्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. पचनप्रक्रिया चांगल्या पद्धतीनं होत असल्यास वजन घटवण्याच्या तुमच्या प्रयत्नात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. यासोबत, चयापचयाची प्रक्रियादेखील सुधारते.
चयापचय (मेटाबॉलिजम )-पचनक्रिया योग्य असल्यास तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.
1. लिंबू आणि आल्याचे डिटॉक्स ड्रिंक
वजन घटवण्यासाठी जर तुम्ही या डिटॉक्स ड्रिंकचे योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात सेवन केले तर याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येईल. लिंबू आणि आल्याचे हे पेय सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळतेच, शिवाय चयापचयदेखील सुधारते. कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक इंच आल्याची पेस्ट करुन मिसळावी. दोन महिने रोज सकाळी दोन ग्लास या पेयाचे सेवन करावे
2. दालचिनीचे डिटॉक्स ड्रिंक
वजन कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. डिटॉक्स ड्रिंक स्वरुपात तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे चयापचय सुधारतेच, शिवाय अतिरिक्त चरबीदेखील घटते. सपाट पोट असावं, अशी इच्छा असल्यास दालचिनीचे सेवन करावे. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन, त्यामध्ये एक छोटा चमचा दालचिनी पावडर टाकावी. झोपण्यापूर्वी हे डिटॉक्स ड्रिंक प्यावे.
3. काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स ड्रिंक
काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स ड्रिंक्स केवळ शरीरातील हानिकारक-विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकते. या ड्रिंकमुळे पचनक्रिया सुधारते. एक ग्लास पाण्यात काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पानं टाकावीत आणि हे पाणी प्यावे.