डाएट सोड्याचे जास्त सेवन करताय?; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:59 PM2019-07-26T12:59:32+5:302019-07-26T13:03:52+5:30
डाएट सोड्याच्या जास्त सेवनाने डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. बॉस्टन यूनिवर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
(Image Credit : Naturally Savvy)
डाएट सोड्याच्या जास्त सेवनाने डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. बॉस्टन यूनिवर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. डाएट सोड्यासारख्या पेयपदार्थांमध्ये ऐस्पर्टेम आणि सॅकरन यांसारखे आर्टिफिशल स्वीटनर्स असतात. ज्यामुळे हे ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. या संशोधनासंबंधित अहवालामध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
(Image Credit : Yahoo)
3 हजार लोकांमध्ये डिमेशिया विकसित होण्याचा धोका
संशोधनासाठी संशोधकांनी जवळपास 4 हजार लोकांची निरक्षणं नोंदवली. त्यांच्यापैकी 3 हजार लोकांमध्ये डिमेंशिया विकसित होण्याची किंवा स्ट्रोकची शक्यता दिसून आली. जेव्हा 10 वर्षांनंतर त्या लोकांचा फॉलोअप घेण्यात आला, तेव्हा असा खुलासा करण्यात आला की, ज्या व्यक्ती सतत डाएट सोड्यासारख्या ड्रिंक्सचं सेवन करतात, त्यांच्यामध्ये अल्झायमर आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका अनेक पटिंनी वाढतो.
(Image Credit : Maxim)
आहार, वय, फिटनेस अनेक गोष्टींची निरिक्षणं नोंदवण्यात आली
जेव्हा संशोधकांच्या टिमने, या लोकांचा आहार, धुम्रपानाची स्थिती, फिटनेस आणि वय यांसारख्या अनेक गोष्टी संशोधनादरम्यान लक्षात घेण्यात आल्या. त्यावेळी असं दिसून आलं की, यांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या विकसित होण्याची शक्यता अधिक होती. हे संशोधन ऑब्जर्वेशनल होतं आणि डाएट सोडा डिमेंशिया आणि स्ट्रोकसाठी कारणीभूत आहे किंवा नाही. हे जाणून घेण्यासाठी आणि सखोल संशोधनाची गरज होती.
3 टक्के लोकांना स्ट्रोक आणि 5 टक्के लोकांना डिमेशिया
बॉस्टन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे एक सिनिअल फेलो मॅथ्यू पेस यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, 'जरी काही लोकांमध्ये स्ट्रोक किंवा डिमेंशियाची समस्या विकसित होण्याची शक्यता तीन पटींनी जास्त असेल, तरिही ते त्यांच्या डाएटवर अवलंबून असतं' पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 'आम्ही केलेल्या संशोधनातून 3 टक्के लोकांना स्ट्रोक आणि 5 टक्के लोकांना डिमेशिया चा धोका असल्याचं सिद्ध झालं आहे. तरिही आम्ही एका लहान समूहाबद्दल बोलत आहोत.'
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.