रोज सकाळी करा मोड आलेल्या कडधान्याचं सेवन, अनेक आजारांचा टळेल धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:54 AM2023-04-19T09:54:43+5:302023-04-19T09:54:50+5:30

Benefits of Sprout: सगळ्यात चांगली बाब म्हणजे मोड आलेल्या कडधान्यात कोणतंही केमिकल नसतं. तसेच याला शिजवलं सुद्धा जात नाही. त्यामुळे मोड आलेले कडधान्य एक नॅच्युरल डाएट आहे.

Consumption of sprout increase rbc and wbc in blood lower risk of heart diseases | रोज सकाळी करा मोड आलेल्या कडधान्याचं सेवन, अनेक आजारांचा टळेल धोका!

रोज सकाळी करा मोड आलेल्या कडधान्याचं सेवन, अनेक आजारांचा टळेल धोका!

googlenewsNext

Benefits of Sprout: स्प्रॉउट म्हणजे मोड आलेलं कडधान्य एक पौष्टिक आहार आहे. मूग, चणे, ज्वारी, बाजरी, मटकीसारखे कडधान्य रात्री भिजवून ठेवायचे आणि सकाळी त्यात कांदा, मीठ आणि टोमॅटो टाकून त्याचं सेवन करायचं. यातील पोषक तत्वांनी शरीराला फार फायदे मिळतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन, कॉपर, मॅग्नीशियम, पोटॅशिअम इत्यादी असतात. तसेच यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडही असतं. जे हृदयासाठी चांगलं असतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे मोड आलेल्या कडधान्यात कोणतंही केमिकल नसतं. तसेच याला शिजवलं सुद्धा जात नाही. त्यामुळे मोड आलेले कडधान्य एक नॅच्युरल डाएट आहे.

डायजेशन चांगलं राहतं

मोड आलेल्या वेगवेगळ्या कडधान्यात भरपूर फायबर असतं ज्याने मेटाबॉलिज्म मजबूत होतं. तसेच यात असे अनेक तत्व असतात ज्याने डायजेशनही चांगलं राहतं. हे तत्व अन्न पचवणं आणि त्यातील पोषक तत्व एब्जॉर्ब करण्याचं काम वेगाने करतात.

एनर्जीही कायम राहते

तसेच मोड आलेल्या कडधान्यात स्टार्चचं प्रमाणही कमी असतं. यात प्रोटीनचं प्रमाणही अधिक असतं. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं ज्यामुळे अनावश्यक काहीही तुम्ही खात नाही. याने वजन वाढत नाही. तसेच तुमची एनर्जीही कायम राहते. 

रक्तासाठीही फायदेशीर

मोड आलेले कडधान्य रक्तासाठीही फायदेशीर आहे. हे रक्तात लाल रक्तपेशी वेगाने वाढतात. यामुळे ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होत राहतं. लालरक्त पेशी वाढल्यावर शरीरात सगळीकडे ऑक्सिजनचा सप्लाय चांगला होतो. ज्यामुळे सगळे अवयव चांगले आणि निरोगी राहतात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते.

बॅड कॉलेस्ट्रॉल होतं कमी

त्यासोबतच मोड आलेल्या कडधान्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं जे रक्तातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करतं. तसेच यात अॅंटी-इम्फ्लामेटरी गुणही असतात जे रक्तवाहिन्या कमजोर होऊ देत नाहीत. 

Web Title: Consumption of sprout increase rbc and wbc in blood lower risk of heart diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.