सतत नेल पेंट लावताय? सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 03:01 PM2016-12-14T15:01:10+5:302016-12-14T15:01:10+5:30
आज प्रत्येक तरुणी नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नेल पेंटचा वापर करताना दिसते. मात्र जर आपण सतत नेल पेंटचा वापर करीत असाल तर आपल्या नखासाठी अपायकारक ठरु शकते.
Next
आ प्रत्येक तरुणी नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नेल पेंटचा वापर करताना दिसते. मात्र जर आपण सतत नेल पेंटचा वापर करीत असाल तर आपल्या नखासाठी अपायकारक ठरु शकते. कारण नखांना तात्पुरते तर सौंदर्य मिळते मात्र यामुळे आपल्या नखांचे मोठे नुकसान होऊन वाढही खुंटते. शिवाय नखे पातळ होऊन तुटताही. तसेच नेल पॉलिश काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिमूव्हरमध्ये असलेल्या अॅसिटोनमुळे नखांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा शोषला जातो. ज्यामुळे नखांच्या भोवतालची त्वचाही कोरडी पडते आणि नखे शुष्क होतात. बरेचजण नेल पेंट ब्लेडने किंवा स्वत:च्या नखाच्या साह्याने घासून काढतात. ज्यामुळे नखावरील पातळ थर निघून जातो. यामुळे नखे कमजोर होऊन तुटतात. बेस कोटशिवाय नेल पॉलिश लावल्यामुळे तुमची नखे पिवळी पडतात. त्यामुळे नेहमी बेस कोट लावूनच नेल पॉलिश लावा. कधीच स्वस्त नेल पॉलिशचा वापर करु नका. यामध्ये केमिकल्स असतात जे तुमच्या नखासाठी हानिकारक असतात. तुम्ही बाजारात भेटणारी विटामिन नेल पॅलिश घेऊ शकता जे तुमच्या नखांना पोषण देईल. तसेच आपल्या नखांना आरामही द्यायला हवा. यासाठी दिवसभरात १०-१५ मिनिट नखे गरम पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे नखे हाइड्रेट होतात.