श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:28 PM2017-10-31T17:28:54+5:302017-10-31T17:30:36+5:30

सुखी जिवनाची गुरुकिल्ली दडलीय तुमच्याच मनात..

Control your breath, it will control your mind too! | श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

googlenewsNext
ठळक मुद्देमनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका.श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील.सततच्या प्रयत्नांनी मनावर नियंत्रण ठेवणं आणि आयुष्य सुखी करणं शक्य.

- मयूर पठाडे

जगात सर्वात, चंचल, चपळ असेल तर ते म्हणजे मन. काही केल्या ते थांबत नाही, हाताशी येत नाही आणि त्याला धरुनही ठेवता येत नाही. एका क्षणात या मनानं गिरक्या तरी किती घ्याव्यात आणि कुठून कुठे जावं?.. त्या कल्पनेलाही अंत नाही.
पण मनावर जो ताबा मिळवतो तो संतपदाला पोहोचतो, असं आपल्या धर्मग्रंथांतही नमूद केलेलं आहे. पण मनाला ताब्यात ठेवण्याइतकी कठीण गोष्ट कोणतीच नाही. अनेक आव्हानं, जबाबदाºया अंगावर असताना आणि रोज, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागणाºय आजच्य काळात तर मन अधिकच चंचल झालेलं आहे.
पण तुम्ही कोणीही असा, मनाला काबूत ठेवण्याची कला तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे, नाहीतर मनाच्या या भन्नाट वेगात आपण कुठल्या कुठे भरकटत जाऊ, हेदेखील तितकंच खरं. अर्थातच भारतीय अध्यात्मात मनाला काबूत ठेवण्यासंदर्भात बरेच प्रयोग झाले आहेत. आपल्या ऋषिमुनींनी त्यावर अखंड चिंतन केलं आहे आणि ते शास्त्रसंमतही झालं आहे म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवरही ते खरं उतरलं आहे. अलीकडच्या काळात भारताच्या या अध्यात्माचा परदेशांतही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे आणि त्यावर प्रयोगही केले जात आहेत. जे आपल्याला आधीच माहीत आहे, ते पुन्हा आपल्यालाच नव्या, रंगरुपांत सादर करुन सांगितलं जात आहे. तसंच आहे हे मनाचं. मनावर ताबा ठेवा, त्यावर कंट्रोल ठेवा, तुमच्या साºया दु:खाचं आणि आनंदाचं मूळही या मनात आहे, म्हणून मनावर लगाम ठेवला, तर तुमचं चित्तही समाधानी राहील आणि तुम्ही सुखी राहाल असा सल्ला पाश्चात्य अभ्यासकांनीही दिला आहे. आॅस्ट्रेलियातील काही अभ्यासकांनी यासंदर्भात नुकताच मोठा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, भरकटणाºया मनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका. श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील. सततच्या या प्रयत्नांनी मनाला तुम्ही थोडं तरी नियंत्रणात आणू शकाल. पण एकदा का ही किमया तुम्हाला साधली की, अनेक ताणांतून तुमची मुक्तता होईल आणि आयुष्य खºया अर्थानं जगायला तुम्ही शिकाल. मनाला लगाम घालण्याचे हे प्रयोग आपल्यालाही करुन पाहायला काय हरकत आहे! त्यातून तोटा काहीच नाही, झालाच तर फायदाच आहे!

Web Title: Control your breath, it will control your mind too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.